कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात फेक न्यूजचे (Fake News) प्रमाण वाढले. कोविड-19 (Covid-19) वरील घरगुती उपचार, औषधं, लसीकरण यासंदर्भात अनेक अफवा सोशल मीडिया माध्यमातून वेगाने पसरु लागल्या. दिवसागणित अशा प्रकारच्या फेक आणि चुकीच्या बातम्यांमध्ये वाढ होत आहे. यात अजून एक मेसेजची भर पडली असून त्यात कोविड-19 लसीचा अभिप्राय घेण्यासाठी येणाऱ्या फोनमुळे मोबाईल हॅक (Mobile Hack) होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमुळे (Viral WhatsApp Message) अनेकांची दिशाभूल होत आहे.
"माझ्या मित्राला 912250041117 नंबरवरुन कॉल आला. लस घेतली असल्यास त्याला 1 दाबायला सांगितले. त्याने 1 दाबताच फोन ब्लॉक आणि हॅक झाला. त्यामुळे या नंबरवरुन कॉल आल्यास सतर्क रहा. त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रमंडळींना आणि ज्येष्ठ नागरिकांना यासंदर्भात माहिती द्या," असे व्हायरल होणाऱ्या फेक व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे.
"पीआयाबी फॅक्ट चेकने या मेसेजचे स्पष्टीकरण दिले आहे. हा फॉर्ड कॉल असून लसीचा अभिप्राय घेण्यासाठी भारत सरकारच्या 1921 नंबरवरुन कॉल येतो," असे पीआयबीने म्हटले आहे. (Fact Check: 'MyGov Corona Vaccine Appt' चा वापर करुन Telegram वर कोविड-19 लसीसाठी अपॉयमेंट बुक करता येईल? PIB ने सांगितले सत्य)
Fact Check By PIB:
Scam Alert
People are receiving #COVID19Vaccine feedback calls from "912250041117". A WhatsApp forward says answering the call can hack phone#PIBFactCheck
▶️This is a #Fraud call
▶️"1921" is number used by Govt. of India for #COVID19Vaccine feedback
🔗https://t.co/fpjhTtTpIx pic.twitter.com/f67YhXqlXV
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 22, 2021
यापूर्वी देखील विविध प्रकारचे फेक मेसेजेस व्हायरल झाले आहेत. यामुळे फसवणूक होऊ नये म्हणून सरकारकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात परिस्थिती अधिक वाईट होऊ नये म्हणून सुजाण नागरिकाप्रमाणे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि कोणतीही माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.