Fact Check: 'MyGov Corona Vaccine Appt' चा वापर करुन Telegram वर कोविड-19 लसीसाठी  अपॉयमेंट बुक करता येईल? PIB ने सांगितले सत्य
Fake news on COVID-19 Vaccine Appointment (Photo Credits: Twitter/PIB Fact Check)

संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) सामना करत असताना सोशल मीडियावर फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले आहे. सोशल मीडियावर सातत्याने खोट्या बातम्या वेगाने पसरत आहेत. यात अजून एका मेसेजची भर पडली आहे. या मेसेज मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, MyGov Corona Vaccine Appt च्या मदतीने टेलीग्राम (Telegram) वर तुम्ही कोविड-19 लसीकरणाची अपॉयमेंट (COVID-19 Vaccination Appointment) बुक करु शकता. व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे.

व्हायरल मेसेजमध्ये टेलीग्राम नंबरच्या माध्यमातून अपॉयमेंट बुक करण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, हा मेसेज खोटा असून यात दिलेला टेलीग्राम नंबर याचा भारत सरकारशी काही संबंध नाही. तसंच लसीकरणासाठी केवळ http://cowin.gov.in किंवा UMANG अथवा Aarogya Setu वरुन बुकींग करु शकता. (प्रधानमंत्री बेरोज़गार भत्ता योजना 2021 अंतर्गत 18 वर्षांवरील बेरोजगार असणाऱ्यांना 3500 रुपये मासिक भत्ता देणार? काय आहे व्हायरल मेसेज मागील सत्य)

व्हायरल मेसेजमधील दावा: कोविड-19 लसीकरणासाठी अपॉयमेंट 'MyGov Corona Vaccine Appt' चा उपयोग करुन टेलिग्रामवर बुक करता येईल.

पीआयबी फॅक्ट चेक: हा फोटो फेक आहे. यात दिलेला नंबर आणि टेलीग्राम अकाऊंट याचा @mygovindia शी काहीही संबंध नाही. लसीसाठी http://cowin.gov.in, UMANG किंवा आरोग्य सेतू अॅप वरुन रजिस्ट्रेशन करु शकता.

Fact Check By PIB:

कोविड-19 संकटकाळात कोरोनावरील उपचार, लसीकरण यासंबंधित अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून पसरत आहेत. चिंतेच्या वातावरणात या फेक बातम्या अधिक गोंधळ निर्माण करतात. त्यामुळे कोणत्याही मेसेजमागील तथ्य पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच संबंधित अधिकृत वेबसाईटवरुन तुम्हाला त्यासंदर्भात योग्य माहिती मिळेल.