Fact Check: केळं खाऊन दूर होते कोरोना व्हायरसचे संक्रमण? पहा या व्हायरल व्हिडीओ मागील सत्य
Banana Cures Coronavirus (Photo Credits: Screengrab)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे, अनेक देशातील हजारो नागरिकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत, या महासंकटावर उपचार शोधण्यासाठी जगभरातील अनेक तज्ञ मंडळी दिवसरात्र मेहनत घेतायत, मात्र अद्याप यावर एक ठोस उपाय सापडलेला नाही, मात्र सोशल मीडियावर या व्हायरवरील उपचाराचे अनेक पर्याय सतत व्हायरल होत आहेत, यातील अनेक दावे हे सपशेल खोटे आहेत. मात्र या व्हायरल व्हिडीओजला व्ह्यूज इतके मिळालेत की त्यामुळे कित्येक जण यावर खरोखरच विश्वास ठेवू लागले आहेत. यातील एक दावा म्हणजे केळ खाल्ल्याने कोरोनाचे संक्रमण दूर होते. एका वृत्त वाहिनीच्या व्हिडिओ मधून हा दावा करण्यात आला आहे, मात्र या व्हिडिओची तपासणी करता हा व्हिडीओ वृत्त वाहिनीच्या अधिकृत व्हिडिओमध्ये फेरबदल करून बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, काय आहे हा दावा आणि काय आहे त्यामागील सत्य हे जाणून घ्या.

Fact Check: मुंबईमध्ये संचार बंदी दरम्यान दूध, भाजीपाला, किराणा दुकानांच्या वेळेवर निर्बंधाच्या बातम्या खोट्या; मुंबई पोलिसांनी WhatsApp वर फिरणार्‍या अफवांबाबत केला खुलासा

AFP या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ABC News च्या वाहिनीवर ऑस्ट्रेलिया क्वीन्स लँड युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय तज्ञ कोरोनावरील उपचारासाठी केळ्याचा फायदा होतोय का याचा तपास घेत आहेत असा दावा करण्यात आला आहे, यामध्ये न्यूज अँकर स्वतः असे सांगत असल्याचे सुद्धा दाखवण्यात आले होते. मात्र हा दावा ज्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे तो व्हिडिओच खोटा असल्याचे दिसून आले आहे. अधिकृत व्हिडीओ मध्ये केळ्याने कोरोना दूर जातो असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही, या अधिकृत व्हिडिओला मॉर्फ करून त्यात असे बदल करण्यात आले आहेत.

पहा अधिकृत व्हिडीओ

दरम्यान, खोट्या व्हिडिओमध्ये केळ्यात व्हिटॅमिन B-6 असून त्याचा उपयोग कोरोनावर मात करण्यासाठी उपयोग होतो असे सांगण्यात आले आहे. मात्र हा दावा खोटा आहे हे आता स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नये असे आदेश याआधी सुद्धा देण्यात आले आहेत, अशा प्रकारात दोषी करावी करण्यात येईल अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.