FACT CHECK Lockdown In Maharashtra: महाराष्ट्र 1 मार्चपासून खरंच होणार लॉकडाऊन? जाणून घ्या काय आहे सत्य
FACT CHECK | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Lockdown In Maharashtra: राज्यात वाढत असलेली कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लाहू होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. असे असतानाच सोशल मीडियांवर काही उपोद्व्यापी मंडळींनी येत्या एक मार्च पासून महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार असे वृत्त आणि त्याबाबतची माहिती शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे या व्हायरल वृत्त आणि माहितीमागचे सत्य? लेटेस्टली मराठीने केलेली ही सत्यपडताळणी (FACT CHECK) घ्या जाणून.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 फेब्रुवारी (रविवार) सायंकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सींग पाळण्याचे अवाहन केले. तसे, आपण या गोष्टी काळजीपूर्वक पाळल्या तर राज्यात कोरोना व्हायरस संक्रम होणार नाही. परिणामी राज्यात लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता भासणार नाही, असे म्हटले. परंतू हा संदेश देताना राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबत आठ दिवसांचा अल्टीमेटमही दिला. प्रत्यक्षात त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. (हेही वाचा, Fact Check: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानांतर्गत सरकार 2100 रुपयांत नोकरी, लॅपटॉप, प्रिंटर आणि मोबाईल देत आहे? जाणून घ्या सत्य)

दरम्यान, काही मंडळींनी मात्र येत्या एक मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केली. ही माहिती प्रसारित करताना एका वृत्तवाहिणीच्या बोधचिन्हासह व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा गौरसमज होतो आहे. परंतू, लेटेस्टली मराठीने केलेल्या पडताळणीत अशा प्रकारचे कोणतेही आदेश राज्य सरकारने दिले नाहीत. एक मार्च पासून राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित झालेले वृत्त केवळ खोडसाळपणा असल्याचे पुढे आले आहे.

सोशल मीडियाच्या अथवा लोकचर्चेच्या माध्यमातून आपल्याकडे लॉकडाऊनबाबतची अशा प्रकारची माहिती आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. तसेच आपणही चुकीची माहिती पुढे पाठवू नका, कोणाला सांगू नका. आलेल्या माहितीची पडताळणी करा. तथ्य तपासा आणि त्यानंतर खातरजमा झाल्यावरच विश्वास ठेवा.