Fact Check: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानांतर्गत सरकार 2100 रुपयांत नोकरी, लॅपटॉप, प्रिंटर आणि मोबाईल देत आहे? जाणून घ्या सत्य
PIB फॅक्ट चेक (Photo: PIB Twitter)

Fact Check: केंद्र सरकारच्या योजनांविषयी खोट्या बातम्या आणि बनावट माहिती सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहे. या खोट्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामुळे लोक संभ्रमित होत आहेत. सध्या महिला आणि बालविकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' (Beti Bachao, Beti Padhao Yojana) अभियानासंदर्भात बनावट बातम्या पसरल्या जात आहेत. व्हायरल बातमीत असे म्हटले जात आहे की, महिला आणि बालविकास अभियानातील 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेचा एक भाग म्हणून 2100 रुपये भरल्यावर नोकरी, लॅपटॉप, प्रिंटर आणि मोबाईल देण्यात येतील.

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिला आणि बालविकास अभियानाच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' च्या बनावट वेबसाइटवर दावा केला जात आहे की, 2100 देऊन नोकरी, लॅपटॉप, प्रिंटर आणि मोबाईल मिळतील. या वृत्ताच्या सत्यतेचा तपास करत पीआयबीने ही वेबसाइट महिला व बाल विकास मंत्रालयाशी जोडलेली नसल्याचे सांगितले आहे. (वाचा - Fact Check: ठाण्यातील Balkum येथे मेट्रो पिलर रस्त्यावरील वाहनांवर कोसळला? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य)

बनावट बातम्या फेटाळून लावत प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (पीआयबी) केलेल्या तथ्य तपासणीत म्हटले आहे की, ही बातमी खोटी आणि निराधार आहे. यासंदर्भातील पत्र बनावट आहे, ही वेबसाइट महिला व बाल विकास मंत्रालयाशी जोडलेली नाही.