Fact Check Thane Metro Pillar Accident (PC - Twitter)

Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनेक ट्विटर यूजर्संनी हा व्हिडिओ ठाण्यातील Balkum येथील असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यातील बालकुम येथे मेट्रो पिलर रस्त्यावरील वाहनांवर कोसळला. या अपघातात रस्त्यावरील अनेक गाड्यांचा चुरा झाला. तसेच गाड्यातील प्रवाशांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र, लेटेस्टली मराठीने या व्हिडिओमागील सत्यता तपासली आहे. यात हा व्हिडिओ जुना असल्याचं निष्पन्न झालं आहे.

इंटरनेटवर जलद गतीने व्हायरल होणाऱ्या अपघाताचा हा व्हिडिओ वाराणसीतील आहे. वाराणसीतील Cantonment Railway Station जवळ 2018 मध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात सुमारे अठराहून अधिक जणांचा जीव गेला होता. या पिलरखाली अनेक गाड्या अडकल्या होत्या. यात या गाड्यांचा चुरा झाला होता. या उड्डाणपुलाखाली अनेक लोक अडकले होते. वाराणसीच्या केंट रेल्वे स्टेशनजवळील वसुंधरा महाविद्यालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ ही घटना घडली होती. (वाचा - Mamata Banerjee on a Scooter: मंत्र्यांनी चालवली स्कूटर, पाठिमागे बसल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; पेट्रोल डिझेल दरवाढीचा हटके विरोध)

व्हायरल व्हिडिओ -  

Original Video: 

दरम्यान, या अपघातानंतर पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला होता. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विट हँडलवरून भाष्य केलं होतं. तसेच पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावादेखील घेतला होता. या अपघात मृत्यू झालेल्या कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच लाख आणि गंभीर जखमींसाठी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली होती. तसेच घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.