पश्चिम बंगाल (West Bengal) राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerje) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा हटके विरोध केला आहे. हा विरोध करताना ममता बॅनर्जी यांनी चक्क इलेक्ट्रीक स्कुटरवरुन ( Electric Scooter) प्रवास केला. ममता बॅनर्जी नेहमी त्यांच्या ताफ्यातील कारने प्रवास करतात. परंतु, आज (गुरुवार, 25 फेब्रुवारी) त्यांनी कारमधून प्रवास नक करता स्कुटरवरुन प्रवास केला. मंत्रिमंडळातील मंत्री फिरहाद हकीम यांनी स्कुटर चालवली तर ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिमागे बसल्या. त्यांनी विधिमंडळ सचिवालयापर्यंत हा प्रवास केला.
हिरव्या रंगाच्या स्कुटरवर बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी डोक्याला हेल्मेट आणि तोंडाला मास्क लावला होता. त्यांच्या गळ्यात एक पट्टा होता. त्यावर इंग्रजी भाषेत लिहिले होते, आपल्या ओठांवर काय आहे. पेट्रोलचे दर वाढविणे, डिझेलची किंमत वाढवणेय आणि गॅस दरात वाढ करणे. (हेही वाचा, Rahul Gandhi यांची स्वाक्षरी घेताना ती रडायलाच लागली; मग राहुल गांधींनी घेतली गळाभेट, फोटोही काढला (पाहा Video))
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा घर ते मंत्रालय असा संपूर्ण दौरा सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला. वाढत्या इंधन दराला विरोध करण्यासाठी ममतांनी हा मार्ग स्वीकारल्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या राज्यात पेट्रोल 100 रुपये प्रतिलीटर दराच्या पार गेले आहे.
पश्चिम बंगाल राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजप सातत्याने निवडणूक प्रचारात उतरली आहे. तर ममता बॅनर्जी यांनीही, महागाई, पेट्रोल आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सककार आणि पर्यायाने भाजपला घेरत आहेत.
दरम्यान, या आधी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी पेट्रोल डिझेलबाबत जोरदार विरोध प्रदर्शन केले होते. तेजस्वी यादव यांनी ट्रॅक्टर चालवत विधानसभेवर पोहोचले होते. त्यांच्यासोबत इतरही काही लोक ट्रॅक्टरद्वारे प्रवास करत होते