काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीआज (18 फेब्रुवारी 2021) पुडुचेरी (Puducherry) राज्याचा दौरा केला. इथे त्यांनी काही मच्छिमार आणि शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी राहुल गांधी यांनी राज्यशास्त्र विभागाच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या वेळी राहुल गांधी यांना भेटून एका मुलीला अश्रू अनावर झाले. मग राहुल गांधी यांनी खाली बसून त्या मुलीची गळाभेट (Rahul Gandhi Hugging A Student) घेतली. तसेच, तिच्यासोबत एक फोटोही काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral Video) झाला आहे.
राहुल गांधी हे पुड्डचेरी येथेल विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत होते. या वेळी एक मुलगी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी आली. राहुल गांधी यांनी जसा तिला ऑटोग्राफ दिला तशी ती मुलगी अगदीच भावूक झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी तिचा हात हातात घेतला. मुलगी आणखी रडू लागली. मग राहुल गांधी यांनी तिची गळाभेट घेतली. लोकांनीही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाईक केला आहे. (हेही वाचा, 'हम दो.. हमारे दो': केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांचा Rahul Gandhi यांना दलित मुलीशी लग्न करण्याचा सल्ला; जाणून घ्या काय म्हणाले )
राहुल गांधी यांनी बोलताना बुधवारी म्हटले की, 1991 मध्ये मी माझ्या वडीलांच्या हत्येमुळे प्रचंड दु:खी झालो होतो. परंतू, ही घटना करणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनात तिरस्कार किंवा राग नव्हता. त्यामुळे त्या लोकांना आम्ही माफ केले. एका विद्यार्थीनिने त्ायंना प्रश्न विचारला की ‘लिट्टे (लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलम) ने आपल्या वडिलांची हत्या केली होत. या लोकांबद्दल आपल्या मनात काय भावना आहे. या वेळी राहुल गांधी म्हणाले हिंसा आपले काहीही बिघडवू शकत नाही.
View this post on Instagram
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला कोणाबद्दल राग अथवा तिरस्कार नाही. मी माझ्या वडीलांना गमावेल आहे. तो माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ होता. तेव्हा मला वाटत होते की, माझे हृदयच कोणीतही हिरावून घेते आहे.