Hindu idols found in the sea ( Photo- Twitter )

इंडोनेशिया मधील बाली येथे समुद्रात 5,000 वर्ष जुन्या हिंदू मूर्ती सापडल्याचा दावा सध्या केला जात आहे. तसेच या संदर्भातील फोटो सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. अनेक ट्विटर आणि फेसबुक युजर्सकडून इंडोनेशियातील बाली समुद्रात सापडलेल्या 5000 वर्ष जुन्या श्री विष्णूजीं चे कोलाज फोटो पोस्ट केले आहेत. तर ट्विटरवरील युजर @NileshOak च्या मते जर या मूर्ति या 5500 वर्ष जुन्या असतील तर मग भारताचा कोणता भाग इंडोनेशिया मध्ये होता आणि त्याचा महाभारतात सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.  या खरचं 5000 वर्ष जुन्या मूर्ति  आहेत का? जाणून घेऊयात या मागचे सत्य. हे ही वाचा (West Bengal: पश्चिम बंगालमध्ये एका बकरीने दिला 8 पायाच्या कोकरूला जन्म, पाहा फोटो)

इंडिया टुडे अँटी फेक न्यूज वॉर रूमला (AFWA) असे आढळले आहे की, या दगडांच्या मूर्ति उत्तर बालीच्या पेम्यूटेरानमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या असून त्या पाण्याखालील बागेतील भाग आहेत. 2005 मध्ये कोरल रीफ कॉन्झर्वेशन प्रोजेक्टचा भाग म्हणून काही स्कुबा डायव्हर्सनी ही शिल्पे तयार केली होती. इंडिया टुडे अँटी फेक न्यूज वॉर इन्वेस्टीगेशननुसार त्यांनी सांगितले की, ''कीवर्ड शोधाच्या मदतीने आम्हाला आढळले की हे फोटो 2010 पासून इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंसह आणि व्हिडिओं व्यतिरिक्त, आम्हाला पॉल टर्लीने 2012 मध्ये पोस्ट केलेले "अंडरवॉटर टेम्पल गार्डन पेमुटरन बाली" नावाचा एक यूट्यूब व्हिडिओ सापडला. या YouTube व्हिडिओमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाच्या समान संरचना पाहिल्या जाऊ शकतात.''

व्हिडिओ वर्णनानुसार, टर्लीने "पाण्याच्या पृष्ठभागाखाली असलेल्या मंदिर बागेत पेम्यूटेरानमधील 'टेम्पल वॉल' या डाइव्हसाईटच्या व्हिडिओ शूट केला आहे . हा व्हिडिओ 2005 मध्ये तयार केलेल्या सामाजिक / पर्यावरण प्रकल्प 'रीफ गार्डनर्स' चा भाग होता.