Goat Gives Birth to Calf With Eight Legs: आपण जरी विज्ञानाच्या आधुनिक काळात जगत असलो तरी, काही चमत्कारांपुढे आपल्याला नतमस्तक व्हावेच लागते. निसर्गाचे हे चमत्कार खरेच आश्चर्यचकित करणारे असतात. याला विज्ञानातही तोड नाही. यातच पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात (North 24 Parganas) असाच काही चमत्कार घडला आहे. बनगाव घाटातील बावड गावात एका बकरीने चक्क आठ पायाच्या कोकरूला जन्म दिल आहे. लोकांना या कोकरूची माहिती मिळताच सर्वजण चकित झाले आणि ते पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरवात केली आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, बनगाव घाटातील बावड गावात सरस्वती नावाची एक महिला पशूपालन करते. त्यांच्याकडे कोंबड्यासह बकऱ्यादेखील आहेत. यातील एका बकरीने शुक्रवारी दोन कोकरूला जन्म दिला. मात्र, त्यातील एक कोकरू पाहून स्वत: सरस्वती आश्चर्यचकीत झाल्या. कारण, या कोकरूला चक्क आठ पाय होती. हे कोकरू जन्मानंतर अवघ्या पाच मिनिटातच दगावले. परंतु, या कोकरूला पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक जमले होते. हे देखील वाचा- कोरोनाची लस घेण्यासाठी पोहचला डायनासोर, पहा हसू न आवरणारा Viral Video
इंडिया टूडेचे ट्वीट-
Goat gives birth to calf with eight legs in West Bengal. Full story here.https://t.co/8aKxRGcWnv
— IndiaToday (@IndiaToday) July 16, 2021
याआधी उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये एका बकीरीने केवळ एकच डोळा असलेल्या कोकरूला जन्म दिल्याची माहिती समोर आली होती. या विचित्र बकरीच्या पिल्लाला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.