कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेली Dr Aisha असू शकते खोटी स्टोरी; व्हायरल झालेल्या फोटोंबाबत नेटिझन्सनी उपस्थित केले प्रश्न,  समोर आले 'हे' सत्य
Dr Aisha fake tweets (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) साथीच्या आजाराने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या काळात दुर्दैवाने अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सोशल मीडियावरील लोक नेहमीच अशा मृत्यूबद्दल दुःख आणि सांत्वन व्यक्त करत असतात, सहानुभूती दर्शवितात. सध्या अशाच डॉक्टर आयशा  (Dr Aisha) नावाच्या मुलीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. Dr Aisha ट्वीटरवर ट्रेंडीगही आहे. मात्र ज्या मुलीबद्दल सर्वांना दुःख वाटत आहे ती मुलगी आयेशा नसल्याचे समोर येत आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ती कथा रचली गेली त्यानुसार, ‘डॉक्टर आयेशा काही दिवसांपूर्वीच डॉक्टर बनली होती व त्यामुळे ती खूपच आनंदी होती. पण त्यानंतर तिला कोरोना विषाणूची लागण झाली व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला.’

दोन दिवसांपूर्वी डॉ आयशा (@Aisha_must_sayz) या नावाच्या एका खात्यातूवरून केलेले एक ट्विट व्हायरल झाले होते. त्यात म्हटले आहे की, आयशा कोरोना व्हायरसशी झुंज देण्यास सक्षम नव्हती आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.’ या ट्वीटमध्ये आयशाचा एका हसरा चेहरा दिसत होता आणि त्याखाली लोकांना तिने कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला होता. आयशाच्या मृत्युनंतर अनेकांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले होते. मात्र ज्या खात्यावरून आयशाबाबतचे ट्वीट करण्यात आले होते ते खाते खोटे असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: तार मध्ये अडकून रिक्षाचालक क्रिश सारखा हवेत उडाला अन् महिलेच्या अंगावर जाऊन आदळला; महिलेला पडले 52 टाके (Watch Video))

ट्वीटमधील डॉ. आयशाच्या पहिला फोटो नक्की कुठला आहे याबाबत काहीच माहिती नाही. परंतु दुसर्‍या फोटोमध्ये ती ज्या व्हेंटिलेटरवर असल्याचा दावा केला आहे, तो Dental Anaesthesia चा आहे. याच खात्यावरून आणखी एक ट्विट केले गेले होते, जे कदाचित तिच्या बहिणीने केले असावे. यात डॉ. आयशा व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसत आहे आणि मजकूरात लिहिले आहे की, 'आयशाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. प्रार्थनेमुळे कदाचित ती या विषाणूपासून वाचू शकेल, धन्यवाद.'

त्यानंतर डॉ. आयशा हे खोटे खाते आहे का खरच आयशा नावाची मुलगी मरण पावली आहे याचा नेटिझन्सनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. .पहिला फोटो एका हसऱ्या मुलीचा आहे (जी आयशा असल्याचे भासवले जात आहे), मात्र या ट्वीटसाठी वापरलेला दुसरा फोटो Dental Anaesthesia चा आहे. गुगलवर याचा शोध घेतला असता हा फोटो अनेक वापरकर्त्यांना आढळून आला. यावरून हे लक्षात येते की, आयशाबाबतची ही कहाणी कदाचित खोटी असू शकते. ही बातमी समजताच अनेकांनी ट्वीट करत हे खाते खोटे असल्याचे सांगितले आहे.