अजब! तार मध्ये अडकून रिक्षाचालक क्रिश सारखा हवेत उडाला अन् महिलेच्या अंगावर जाऊन आदळला; महिलेला पडले 52 टाके (Watch Video)
Bangalore Viral Video (Photo Credits: Twitter)

सोशल मिडियावर (Social Media) मिनिटा-मिनिटाला काही ना काही व्हिडिओज व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. बंगळूरुमधील (Bangalore) हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये रस्त्यावर असलेल्या तारेमध्ये अडकून एक रिक्षाचालक क्रिश सारखा हवेत उडाला आणि त्याच रस्त्यावरूनच जात असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन आदळला. मुख्य म्हणजे ज्या महिलेच्या अंगावर तो आदळला त्या महिलेला 52 टाके पडले आहेत. हा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर

झाले असे की, हा व्हिडिओ बंगळूरूच्या टीसी पाल्या रोड येथील आहे. जेथे एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन जात असताना त्याचे चाक रस्त्यालवरील तारेमध्ये अडकले. ते काढण्यासाठी तो रिक्षातून खाली उतरला. त्यानंतर त्याला अंदाजच नव्हता की त्याच्यासोबत पुढे काय भयानक प्रकार घडणार आहे ते. उत्तर प्रदेश: झोपलेल्या व्यक्तीच्या पॅन्टमध्ये अचानक घुसला किंग कोबरा, Video मध्ये पहा पुढे काय झाले

त्याचवेळी त्याच्या रिक्षाच्या बाजूने एक मोठा ट्रक जात होता आणि त्याचे टायरसुद्धा या तारेत अडकले. या तारेवर ट्रकचा दबाव पडल्यामुळे उभा असलेला रिक्षाचालक चालक त्यात अडकला आणि त्याला एक झटका लागून तो क्षणार्धात हवेत उडाला. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या महिलेच्या अंगावर जाऊन तो आदळला. या दुर्घटनेत त्या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना जेथे घडली तेथे जवळच त्या महिलेच्या पतीचे ऑफिस होते. ज्यामुळे तिच्या पतीला ही बातमी कळताच त्याने त्वरित तिला रुग्णालयात दाखल केले.

यात महिलेला इतकी गंभीर दुखापत झाली आहे की, तिला 52 टाके पडले आहेत. सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 16 जुलैचा आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित टेलिकॉम कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.