जगभरातील विविध सापांच्या जातीमधील किंग कोबरा (King Cobra) हा सर्वाधिक विषारी आणि खतरनाक साप असल्याचे म्हटले जाते. किंग कोबराला पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. कारण या सापाने जर खंड मारला तर त्यापासून जीव वाचवणे मुश्किल होते. गेल्या काही दिवसांपासून किंग कोबराबद्दल काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशातील मिर्जापुर मधील एक व्हिडिओ समोर आला असून तो पाहिल्यावर तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या जातील. व्हिडिओतून असे दिसून येत आहे की, झोपलेल्या एका व्यक्तीच्या पॅन्टमध्ये किंग कोबरा अचानक घुसला. असे सांगितले जात आहे की, कामगारांचा समूह वीज संदर्भातील काही काम करत होता.
रात्रीचे जेवण झाल्यावर कामगार जवळच्या अंगणवाडी केंद्रात आराम करत होते. अचानक मध्यरात्री एक कोबरा साप कामगाराच्या पॅन्ट मध्ये शिरला. त्यानंतर त्याला आपली जीव वाचवण्यासाठी तब्बत 7 तास उभे रहावे लागले. परंतु 7 तासानंतर जेव्हा साप पकडणारे अधिकारी घटनास्थळी पोहचले त्यावेळी त्याला थोडा दिलासा मिळाला. पोटात घुसलेल्या कोबराचा रेस्क्यू व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला आहे.(Black Panther च्या अंगावरही दिसतात स्पॉट्स? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ब्लॅक पॅंथरच्या फोटो व्हायरल मध्ये दिसली दुर्मिळ झलक!)
ही घटनाा मिर्जापुर मधील जमालपुर गावातील आहे. ज्यावेळी कामगारांचा समूह सातत्याने वीजेच्या खंब्यासंदर्भात काम करत होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एकूण 8 कामगार एकत्रित काम करत होते. परंतु 28 वर्षीय लवकेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या पॅन्टमध्ये किंग कोबरा साप शिरला. साप पॅन्टमध्ये शिरल्याचे पाहून कामगाराच्या जीवाचा थरकापच उडाला होता. परंतु किंग कोबरा पासून सुटका आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्याला तब्बल 7 तास एकाच ठिकाणी न हलता उभे रहावे लागले. परंतु यामधील मुख्य गोष्ट म्हणजे सापाने व्यक्तीला कोणतीच इजा केली नाही. दरम्यान, ही घटना रात्रीच्या वेळेस घडल्याने 7 तासानंतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. योग्य वेळी सापाची सुटका करण्यासाठी त्याची पॅन्ट फाडण्यात आल्याचे सांगण्यात आली.