ब्लॅक पॅंथरच्या शरीरावर त्याच्या फर खाली काळे स्पॉट असतात हे तुम्हांला ठाऊक आहे का? सध्या महाराष्ट्रातील विदर्भामधील ताडोबा अभयारण्यामधील ब्लॅक पॅंथरचा फोटो व्हायरल होत आहे. सध्या या फोटोमधील त्याच्या शरीरावरील स्पॉट्स नेटकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील ब्लॅक पॅंथरचे व्हायरल झालेले फोटो अशाचप्रकारे नेटकर्यांच्या चर्चेचा विषय बनला होता. हो हे खरं आहे की ब्लॅक पॅंथरच्या शरीरावर देखील स्पॉट्स असतात. मात्र त्याच्या शरीरावरील दाट काळ्या केसांमुळे अनेकदा ते दिसत नाहीत. त्याला ghost rosettes देखील म्हणतात. मात्र ब्लॅक पॅंथरच्या अगदी दूर्मिळ फोटोंपैकी एक असलेल्या सध्या व्हायरल होत असलेल्य फोटोंमध्ये त्याच्या अंगावरील केस आणि सोबतीने स्पॉट्सदेखील पाहता येऊ शकतात.
वाईल्ड इंडिया या ट्विटर अकाऊंटवरून प्राण्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. हा फोटोदेखील त्यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान Abhishek Pagnis या वाईडलाईफ़ फोटोग्राफरने हा फोटो टिपला आहे. बिबट्याच्या अंगावर जसे स्पॉट्स असतात तसेच ब्लॅक पॅंथरवर देखील असतात मात्र ते फारच विरळ दिसतात.
वाईल्ड इंडियाचा फोटो
#Bagheera from Tadoba. This is how actually the melanistic leopard looks like. Rosettes are clear when looked from close. This beauty captured by @abhishek_pagnis. pic.twitter.com/eOygYfCzwp
— Wild India (@WildIndia1) July 27, 2020
अभिषेक पागनीसने टिपलेला फोटो
वन्यजीवांबद्दल अनेकांना कुतुहल असतं. सध्या अनेक दुर्मिळ प्राण्यांचे फोटो अशाच प्रकारे व्हायरल होतात. त्यामागे वाईल्ड फोटोग्राफरची देखील कमाल असते. अनेक वर्षांची मेहनत आणि संयम असतो.