Desi kombda | Representational image (Photo Credits: pxhere)

Desi kombda Viral Video: सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. लोकही अगदी छोट्या गोष्टीचाही पराचा कावळा करतात. परिणामी अत्यंत क्षुल्लक वाटाव्यात अशा गोष्टींनाही महत्त्व येते. आता हेच पाहा ना.. एखाद्या देसी कोंबड्याला धडधाकट तरुण घाबरला असे म्हटले तर तुम्हाला ते पटेल का? कदाचित नाही. पण असे घडले आहे खरे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक देशी कोंबडा दिसतो. या देशी कोंबड्याची कळ एक तरुण काढतो. त्यावर हा कोंबडा भलताच भडकतो आणि त्या तरुणाच्या पाठी लागतो.

देसी कोंबडा चिडल्याचे पाहून या तरुणाची भीतीने गाळण उडते. तो धूम ठोकतो. पण पळण्याच्या नादात आपण कुठे धावतो आहे हेही त्याला कळत नाही. हा तरुण चक्क एका झाडावर उडी मारतो. नशीब त्याला लागत नाही. पण तो त्या झाडावरुन खाली एका छोट्या नाल्यात पडतो. आणि मग तिथून पळून जातो. (हेही वाचा, Death Of Chicken In Maharajganj: कोंबडी मेली, माजी आमदार पूत्राकडून पोलीसत तक्रार, थेट हत्येचाच गुन्हा)

देसी कोंबडा भारतीय कुटुंबाबमध्ये सर्रास पळला जातो. कोंबडी पालन म्हणजेच कुक्कुटपालन हे भारतीय समाजव्यवस्थेला नवे नाही. ग्रामीण भागात घरोघरी कोंबड्या पाळल्या जातात. त्यातच एखादा कोंबडा जन्माला येतो. देसी कोंबडा असो की कोंबडी त्यांचे मांस मात्र रुचकर लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोंबड्यांना बाजारात चांगलीच मागणी असते. अर्थात बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या कोंबड्या, कोंबडे मिळतात. त्यातील काही संकरीत असतात. (हेही वाचा, लज्जास्पद! 37 वर्षीय नराधमाने केला कोंबडीसोबत Sex; पत्नीनेचं रेकॉर्ड केला व्हिडिओ, न्यायालयाने आरोपीला सुनावली 3 वर्षाची शिक्षा)

व्हिडिओ

संकरीत कोंबड्यांना इंग्लीश कोंबडी म्हणण्याचाही प्रघात आहे. या कोंबड्या साधारण पांढऱ्या रंगाच्या असतात. पण, देशी कोंबड्या मात्र वेगवेगल्या वाणाच्या असतात. ज्यात तांबडा, राखूंडी, काळा, पिवळा, पांढरा, असे नानावीध रंग पाहायला मिळतात. इंग्लीश कोंबड्या मात्र तुलनेत एकाच रंगाच्या असतात.