'माझा कोंबडा कोणी मारीयला' हे लोकप्रीय कोळीगीत आपण ऐकले असेल. या कोळी गीताची आठवण येण्यासारखीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्यात एका माजी आमदार पूत्राने पोलिसांत तक्रार दिली आहे. राजकुमार भारती असे या आमदारपूत्राचे नाव आहे. तो माजी आमदार दिवंगत दुख्की प्रसाद यांचा चिरंजीव आहे. आमदार पूत्राची कोंबडी मृत पावली आहे. कोंबडी मेल्याचे समजताच आमदारपूत्राने चक्क पोलिसात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच सिंदुराई पोलिसांनी (Sendurai Police Station) अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हाही दाखल केला. सिंदुरियां पोलीस स्टेशन दप्तरी हा गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या कोंबडीवर विषप्रयोग झाल्याचे तक्रारदाराचे म्हणने आहे. कोंबडीला कोणीतरी विष दिल्यानेच तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिचे पोस्टमार्टम करण्यात यावे असे तक्रारदाराचे म्हणने आहे. पोलीसही तपास करण्याच्या कामी लागले आहेत.
सिंदुरीया पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा कल्याण गावाचे रहिवासी असलेले माजी आमदार दिवंगत दुख्की प्रसाद यांचे चिरंजीव राजकुमार भारती यांनी शनिवारी (11 ऑगस्ट) आपली तक्रार पोलिसांमध्ये दिली. त्यांची तक्रार पाहून पोलीस आणि इतरही लोक चांगलेच चक्रावले. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीची माहिती मिळताच या प्रकरणाची जोरदार चर्चा परिसरात सुरु झाली. आता या गुन्हाबाबत प्रसारमाध्यमांतूनही वृत्त आले आहे. (हेही वाचा, लज्जास्पद! 37 वर्षीय नराधमाने केला कोंबडीसोबत Sex; पत्नीनेचं रेकॉर्ड केला व्हिडिओ, न्यायालयाने आरोपीला सुनावली 3 वर्षाची शिक्षा)
राजकुमार भारती यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी घरी कोंबड्या पाळल्या आहेत. मला पोपट, कबूतर कोंबडी पाळण्याचा छंद आहे. राजकुमार भारती यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो आणि त्याचे कुटुंबीय काही महत्त्वाच्या कामानिमित्त महराजगंज येथे आले होते. काही वेळाने मुलगा विकास शाळेतून घरी परताल तेव्हा पाहिले तर कोंबडी तडफडत असल्याचे त्याच्या दिसले. त्यानंतर अघ्या काहीच मिनिटांमध्ये तिचा मृत्यू झाला. कोंबडीची एकूण आवस्था पाहता असे दिसते की, कोंबडीला जाणीवपूर्वक मारण्यात आले आहे. तिला कोणीतरी विष दिले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करावा असेही या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस ठेशनचे प्रमुख उमेश कुमार यांनी तक्रार प्राप्त झाली असून, प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे.