वाढदिवस कोणाचा साजरा करायचा? या प्रश्नाचे उत्तर हौसेला मोल नाही असेच द्यावे लागेल. कारण हौसेपाई कोण काय करेल हे कोणालाच सांगता येत नाही. कोल्हापूर (Kolhapur) येथे नुकताच एका पठ्ठ्याने जेसीबीचा वाढदिवस साजरा केला. आणखी कुणीतरी कुत्रा, मांजर, बैल अशा प्राण्यांचे वाढदिवस साजरे केले. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कागदेलवार या ‘ॲनिमल लव्हर’ फॅमेलीने आता चक्क कोंबड्याचा वाढदिवस (Chicken Cock's Birthday Celebration) साजरा केला आहे. वाढदिवस साजरा झाल्याने फॅमेलीचा 'कुचा' नामक कोंबडा (Chicken) सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कागदेलवार कुटुंबीय उमरेड शहरातील मंगळवारी पेठेत राहतात. हे कुटुंबीय सांगतात की 'कुचा' (कोंबडा) त्यांना खूप प्रिय आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा तो लाडका आहे. हा कोंबडा घरी आल्या त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले. म्हणूनच या कुटुंबाने या कोंबड्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. (हेही वाचा, Death Of Chicken In Maharajganj: कोंबडी मेली, माजी आमदार पूत्राकडून पोलीसत तक्रार, थेट हत्येचाच गुन्हा)
कोंबड्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबातील सदस्या आणि 'कुचा'च्या मालकीण सुरभी कागदेलवार या वाढदिवस साजरा करण्यासाठी अधिक अग्रही होत्या. मग ठरले. कार्यक्रम आखला गेला आणि 20 सप्टेंबर रोजी या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसासाठी केक आणला गेला. गोडधोडाचे जेवन करण्यात आले. घर सजविण्यात आले. शेवटी केक कापला गेला. या हटके वाढदिवसाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'कुचा'च्या वाढदिवसानिमित्त खास चिकनचा बेत आखला गेला नाही हे अधिक महत्त्वाचे. (हेही वाचा, लज्जास्पद! 37 वर्षीय नराधमाने केला कोंबडीसोबत Sex; पत्नीनेचं रेकॉर्ड केला व्हिडिओ, न्यायालयाने आरोपीला सुनावली 3 वर्षाची शिक्षा)
प्राणी, पक्षी आदी घटकांचे वाढदिवस साजरे करण्याची नागपूरातील ही पहिलीच घटना नाही. या आधीही एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कुत्रीचे डोहाळे जेवण घातले होते. अरुण बकाल असे या अधिकाऱ्याचे नाव. सध्या ते शांतीनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना ‘ॲनिमल लव्हर’ म्हणूनही ओळखले जाते. खरे म्हणजे घरातील महिला गर्भवती राहिली की ‘कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण घालण्याची प्रथा समाजात आहे. पण, ही कुत्री देखील आपल्या घरातीलच एक सदस्या आहे, असे समजून या पोलीस अधिकारी महोदयांच्या कुटुंबीयांनी कुत्रीचे डोहाळे जेवण घालण्याचा कार्यक्रम केला होता. महत्त्वाचे असे की, कुत्रीच्या डोहाळे जेवणासाठी या कुटुंबाने त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांना निमंत्रण दिले होते.अनेकांनी या हटके कार्यक्रमाचे कौतुक केले. तर अनेकांनी या कार्यक्रमावर टीकाही केली होती.