Dolphins spotted in Mumbai (Photo Credits: Video Grab)

कोरोना व्हायरसमुोळे देशभरासह मुंबईत सुद्धा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण मुंबई बंद झाल्याची परिस्थिती दिसून आली होती. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे समुद्रात डॉल्फिन दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मरिन ड्राइव्ह येथे अन्य वेळी ऐवढी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येते मात्र जनता कर्फ्यूमुळे येथे एक ही नागरिक दिसून आला नाही. पण डॉल्फिन दिसल्याने लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केल्या आहेत.अभिनेत्री जुही चावला हिने ट्वीटरवर मरिन ड्राइव्ह येथे 3 डॉल्फिन दिसल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने असे म्हटले आहे की, मुंबईतील हवामान पाहता डॉल्फिन दिसणे ही विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. तसेच अन्य युजर्सनी सुद्धा ट्वीटरवर डॉल्फिन दिसल्याची पोस्ट शेअर केल्या आहेत.

मरिन ड्रायइव्ह सारख्या ठिकणी डॉल्फिन दिसणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. पण अन्य दिवशी सुद्धा असेच डॉल्फिनचे दर्शन व्हायला हवे असे सुद्धा काही जणांना आता वाटू लागले आहे. तर राज्यातील लॉकडाउनची परिस्थिती पाहता हवेच्या आद्रतेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आली आहे. त्यामुळेच मासे या हवामानासोबत समरुप झाल्याने दिसून येत आहेत. तर लॉकडाउनची परिस्थिती ही नागरिकांसह समुद्री जीवनावर सुद्धा कशी लागू झाली आहे हे दिसून येत आहे.(Janata Curfew निमित्त सोशल मीडियावर मेसेजसह WhatsApp Stickers, Images चा पाऊस; घरीच सुरक्षित राहत Coronavirus Chain मोडण्यास मदत करण्याचं आवाहन)

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आले आहे.