Janata Curfew निमित्त सोशल मीडियावर  मेसेजसह WhatsApp Stickers, Images चा पाऊस; घरीच सुरक्षित राहत Coronavirus Chain मोडण्यास मदत करण्याचं आवाहन
Stay Home, Stay Safe messages (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगासह देशातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. दिवसागणित देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्या 300 वर गेली असून 6 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) ची हाक दिली.  कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. तसंच घरी सुरक्षित राहण्याचे आवाहनही अनेक माध्यमातून करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूला नागरिक उत्फुर्त प्रतिसाद देत असून सोशल मीडियावर पॉझिटीव्ह मेसेज फिरताना दिसत आहेत.

जनता कर्फ्यू निमित्त सोशल मीडियावर  मेसेजसह WhatsApp Stickers, Images चा पाऊस पडला आहे. तसंच या मेसेजेस मधून घरी सुरक्षित राहा, कुटुंबाची काळजी घ्या असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरसची साखळी मोडण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

जनता कर्फ्यू निमित्त सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस:

या सोबत अनेक खास मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत. तुम्ही देखील यापैकी काही मेसेजेस आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्टांसोबत शेअर करुन सामाजिक जाणीव जपू शकता.