चीन: Horizon वर दिसले पाच सूर्य; मंगोलिया मधील 'हे' अद्भुत दृश्य पाहा (Watch Video)
Sun Rise (Photo Credits: Twitter)

सकाळी लवकर उठून सूर्यदर्शन घेणाऱ्याला सोन्याची कोंबडी दिसते अशी एक दंतकथा आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी ऐकली असेल पण चीन (China) मधील काही नागरिकांना आज, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी घरबाहेर पडताच सोन्याच्या कोंबडी इतकाच आश्चर्यचकित करणारे दृश्य पाहायला मिळाले. उत्तर चीन (North China) मधील मंगोलिया (Mongolia) मध्ये काही भागात आज सकाळी क्षितीजाच्या जवळच तब्बल पाच सूर्य पाहायला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या चमत्कारी घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे तर चीन मधील एका मोठ्या मीडिया फर्मने सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत, हा निसर्गाचा सुंदर चमत्कार असल्याचे म्हंटले आहे. राजस्थान: अलवर येथील फॅक्टरी वर उल्कापात; कॅमेऱ्यात कैद झाली चमत्कारिक खगोलशास्त्रीय घटना (Watch Video)

या चमत्कारिक घटनेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण सांगताना काहींनी हा दृश्यभास असल्याचे म्हंटले आहे, वातावरणातील तापमान -20 डिग्रीच्या खाली गेल्यास अशा प्रकारचे दृश्य दिसून येते असे सांगितले जातेय.

पहा पाच सूर्यांचा हा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत हा प्रकार प्रदूषणामुळे तर झालेला नाही ना? असा सवाल केला आहे तर काहींनी हा प्रकार उद्या म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळेल, यावेळी चंद्र आणि मंगळ रेषेत येऊन असा भास निर्माण होईल असे भाकीत वर्तवले आहे. या घटनेचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही, मात्र ही घटना खरी ठरल्यास हा सर्वात मोठा चमत्कार ठरू शकतो.