राजस्थानच्या (Rajasthan) अलवर (Alwar) भागात मंगळवारी, 11 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.10 च्या सुमारास उल्कापात (Meteroite) ही दुर्मिळ घटना घडली आहे. योगायोगाने हा क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. अवकाशातुन तुटलेली ही उल्का जेव्हा कोसळली तेव्हा आसपासच्या परिसरात काही सौम्य झटके जाणवल्याने स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. एकूण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने या घटनेचा ठोस पुरावा मिळाला आहे, यासंबधी खगोलशास्त्रज्ञांची टीम घटनास्थळी जाऊन तपास करणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अलवर येथील इटारना औद्योगिक क्षेत्रात ही घटना घडली, उल्कापाताची घटना ज्या भागात घडली तिथे सुदैवानी फारशी वस्ती नसल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जवळच्या भागात याचे झटके जाणवल्याने लोक घाबरले होते, सीसीटीव्हीही मध्ये हा प्रकार सापडल्याने ही उल्कापाताची घटना असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या भागात प्रवेश घेण्यास मनाई केली आहे.
पहा हा व्हायरल व्हिडीओ
Meteorite falls in a village in Rajasthan, causes a 20-feet deep crater.
Details by TIMES NOW's Arvind. pic.twitter.com/JLZanJYAE2
— TIMES NOW (@TimesNow) February 12, 2020
दरम्यान, याआधी जुलै 2019 मध्ये राजस्थानातील नंगला कसोता गावात उल्कापात झाला होता, यात सुद्धा एका शेतात उल्कापात झाल्याने 20 फूट खड्डा खणला गेला होता. जवळजवळ दररोज असे टनभर अवकाशातील तुकडे घसरत असतात परंतु बहुतांश उल्का पृथ्वीच्या वातावरणापर्यंत पोहोचण्यापूर्वी जळून खाक होतात. पण हे जरासे असामान्य होते, ही उल्का थेट राजस्थानात कोसळली आहे.