Chewing Gum-Making Viral Video |

च्युईंग गम (Chewing Gum) आपल्यापैकी अनेकांना आवडतो. अनेकजण त्याचा चाऊन चोथा झाला तरीही चगळतच असतात. सुरुवातीचा गोडवा संपल्यावर उरलेल्या चोथ्याचा फुगा (बबल) बनवणे हात तर अनेकांच्या आवडीचा विषय. पण, हाच च्युइंग गम बनवताना तुम्ही केव्हा पाहिले आहे काय? कदाचित नसेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Chewing Gum-Making Viral Video) झाला आहे. जो पाहून तुम्ही आयुष्यात च्युइंग गम खाण्याचे नाव काढणार नाही. इतका हा व्हिडिओ किळसवाणा आहे. अर्थात लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. पण, सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यात मात्र हा व्हिडिओ च्युइंगम बनवतानाचाच असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का

खरे तर च्युईंग बनविण्याचा हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला तशी वादाला सुरुवात झाली आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या कंपनीतील किंवा कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्याची बनविण्याची पद्धत पाहून मात्र अनेकांना धक्का बसला आहे. काही मंडळींनी तर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर च्युईंगम खाने तर सोडाच पण त्याकडेही पाहणेही आपण बंद करु असे म्हटले आहे. (हेही पाहा, Shrimp Cooks In Plane Bathroom: विमानाच्या टॉयलेटमध्ये शिजवली कोळंबी, Video व्हायरल)

अनेकांकडून रबर शेतीचा दावा

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका फॅक्ट्रीमध्ये काही कामगार च्युइंगम बनवत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या चवी याव्यात आणि तो खूप चांगल्या पद्धतीने मिसळला जावा यासाठी हे लोक चक्क त्यावर अनवाणी पायाने तो तूडवत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, फॅक्ट्रीच्या एका मोठ्या सपाट जागेवर कणकीसारखे लगदेच्या लगदे टाकण्यात आले आहे. ज्यावर फॅक्ट्रीतील कर्मचारी अक्षरश: ते पायाने तुडवत आहेत. ज्यामध्येत्यांनी स्वत:च्या पायांना कोणत्याही प्रकारचे अवरण घातले नाही की, शरीरावरचा घाम अथवा तोंडा, नाकावाटे निघणारे पदार्थ खाली पडले तर त्याची विल्हेवाट कशी लावली जाणार याचाही त्यांनी विचार केलेला दिसत नाही. सांगितले जात आहे की, हे कामगार जे लगते तुडवत आहेत ते सर्व च्युइंगमचेच आहेत. व्हिडिमधील निवेदकही कामगार हे काम करत असताना ते आपले पाय स्वच्छ धूत असल्याचा दावा करताना आढळतो. (हेही वाचा, Old Monk Chai: ‘ओल्ड माँक टी’ बनवण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल, नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mega fact (@_mega_fact_)

दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चा पाहता युजर्समध्येही विविध मतभेद पाहायला मिळतात. काही लोकांनी व्हिडितील कामगारांच्या पायाखाली तुडवला जाणारा पदार्थ च्युइंग गम असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी हा व्हिडिओ च्युइंगम बनवतानाचा नव्हे तर, तो रबरच्या शेतीमधील आहे. त्यामुळे चुकीची माहिती शेअर करणे थांबवा असेही काही लोकांनी म्हटले आहे. व्हिडिओखाली अनेक वापरकर्ते जोर देतात की उत्पादित केलेला पदार्थ रबर आहे, च्युइंगम नाही.