Bathroom Chef | (Photo courtesy: instagram)

विमानाच्या बाथरुममध्ये कोळंबी शिजवताना (Shrimp Cooks In Plane Bathroom) एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्यक्ती Barfly7777 किंवा "बाथरूम शेफ" (Bathroom Chef) या नावाने ओळखला जातो. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. व्हिडओ पाहिल्यावर कदाचित आपलाही संताप होऊ शकतो. अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास सुमारे 1.2 दशलक्ष किंवा त्याहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी वॉशरूमचे सिंक पाण्याने भरले. मग त्याने विसर्जन रॉडला बॅटरी जोडल्या आणि पाणी उकळण्यास सुरुवात केली. सिंकमधील पाणी उकळू लागल्यावर त्याने त्यात कोळंबी घातली. चव वाढवण्यासाठी त्या माणसाने थोडे मीठ आणि थोडे लसूणही वापरला. नंतर त्याच पाण्यात लसणाची चटणी आणि उखडलले बटाटे घातले आणि ते कालवले. (हेही वाचा, 'Make Your Own Roti': लग्नात पाहुण्यांनाच जुंपले स्वयंपाकाला (Watvh Video))

व्हिडिओ पाहून अनेकांनी किळस व्यक्त केली. अनेकांनी तर या किळसवाण्या प्रकाराबद्दल या व्यक्तीला विमान प्रवासावर बंदीच घालावी असे म्हटले. काही लोकांनी संताप व्यक्त करत विमान कंपनीलाच जबाबदार धरले आहे. अशा लोकांना असे वर्तन करण्यास आपण परवानगीच कशी देता? असा सवाल विचारला आहे. तसेच, सदर विमान कंपनीवरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

व्हिडिओ

अनेकांनी मात्र व्हिडिओची चांगलीच मजा घेतली आहे. काहींनी हा व्हिडिओ आपल्याला प्रचंड आवडल्याचे आवर्जून नोंदवले आहे. तसेच, ही कोळंबी आपणच टेस्ट करुन पाहा असा सल्लाही संबंधीत व्यक्तीला दिला आहे. दरम्यान, विमानामध्ये अशा चित्रविचीत्र घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याही आधी अशा अनेक चित्रविचीत्र घटना विमानात घडल्या आहेत. जसे की, कधी कधी विमान ऑटो मोडवर टाकून पायलट झोपी जातो. कधी हवाई सुंदरी मध्येच एखाद्या गाण्यावर नाच करतात. कधी कधी क्रू मेंबर्स विमानातच नको तितकी जवळीक निर्माण करुन भलतेसलते उद्योग करतात. कधी एखादा प्रवाशी क्रूमेंबरसोबत चुकीचे वर्तन करतो. कधी एखादा प्रवाशी विमानात असा काही राडा घालतो की, त्यामुले विमानाचे आपत्कालीन लँडीगही करावे लागते. दरम्यान, विमानामध्ये केल्या वर्तनाची गंभीर दखल घेतली जाते. गुन्हा पाहून शिक्षाही दिली जाते. यात कधी अटकेची, दंडाची, कारावासाची कारवाई होते. तर कधी विमानप्रवासालाच बंधी घातली जाते.