केळ्यांमधून कैद्यांना पैसे पुरवले जातात? व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रवाल (Video)
केळ्यातून पैशांची तस्करी (फोटो सौजन्य-YouTube)

केळ्यातून (Banana) पैसे पाठवणे हे शक्य आहे का? कधी अशा प्रकारच्या घटना समोर सुद्धा आल्या नाहीत. मात्र आता एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून चक्क केळ्यांमधून कैद्यांना पैसे पुरवले जात असल्याचे समजले आहे. तसेच समोरुन पाहिल्यास केळ्यात पैसे लपवले आहे की नाही हे कळतच नाही.

सध्या सोशल मीडियात व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती केळ्याच्या घडातील काही केळी बाजूला काढली जात आहेत. तर केळ्याच्या खालील बाजूस एक सफेद रंगाची चिकटपट्टी लावण्यात आली असून तिच केळी तो व्यक्ती बाजूला करत आहे. त्यानंतर व्यक्तीकडून केळ्याची साल सोलत असून त्यामध्ये प्लास्टिक पेपर मध्ये रोल केलेली गोष्ट दिसून येते. त्यामध्ये 500 रुपयांच्या काही नोटा दिसून येत आहेत. तर दुसऱ्या केळ्यात 2 हजार रुपयांच्या नोटा आणि तिसऱ्या केळ्यात पुन्हा 500 रुपयांच्या नोटा दिसत आहेत. तर पाहा हा खालील व्हिडिओ:

(अन् गाय मुलांसोबत फुटबॉल खेळू लागली! Viral Video)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गाचा उपयोग करुन तुरुंगात किंवा काही ठिकाणी पैशांची तस्करी केली जाते. मात्र केळ्यातून करण्यात येणारी तस्करी पटकन कळून येत नाही. परंतु सरकारने केळ्याच्या तस्करीचा सुद्धा छडा लावला आहे.