अन् गाय मुलांसोबत फुटबॉल खेळू लागली! (Viral Video)
Cow plays football (Photo Credits: Muzik Doktorz YouTube)

पावसाळा सुरु झाला की आपल्याला अनेक गोष्टींचे वेध लागतात. म्हणजेच पावसाळी पिकनिक, गरमागरम कांदाभजी, वाफाळलेला चहा, लॉन्ग ड्राईव्ह इत्यादी. त्याचबरोबर पावसाळ्यात अजून एक मजा असते ती म्हणजे फुटबॉल (Football) खेळण्याची. क्रीडाप्रेमींसाठी तर पावसाळ्यात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच असते. असाच एक फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात एक गाय मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लूटत आहे. गायीचे हे फुटबॉल खेळण्याचे कौशल्य कमाल आहे.

सुरुवातीला खेळताना गायीच्या पायाजवळ फुटबॉल जातो. तो मिळवण्यासाठी मुलं धडपडत असतात. मात्र त्यानंतर गायीलाच फुटबॉल खेळण्याचा उत्साह येतो आणि ती चक्क त्या मुलांसोबत फुटबॉल खेळू लागते.

पहा व्हिडिओ:

इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ गोव्याचा असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी देखील एका महिलेसोबत फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.