रागाच्या भरात माणूस काहीही करतो. रागात असताना त्याचा स्वतःवर ताबा नसतो, त्याला चांगले-वाईट कळत नाही. म्हणूनच म्हटले जाते की, व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, नाहीतर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या अशाच रागाशी संबंधित अमेरिकेत (US) राहणार्या एका व्यक्तीची चर्चा होत आहे. या व्यक्तीला त्याचा राग आवरता आला नाही आणि त्याने एक भयानक कृत्य केले. रागाच्या भरात या व्यक्तीने कंडोममध्ये गुंडाळलेले केळ (Condom Wrapped Banana) गिळले.
म्हणजेच रागात या व्यक्तीने चक्क कंडोम गिळले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी मोठ्या कष्टाने शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील कंडोम असलेले केळ बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचला. न्यूयॉर्क पोस्टने आपल्या एका अहवालात या प्रकरणाचे वर्णन जगातील अशा प्रकारचे पहिले प्रकरण असल्याचे केले आहे. डॉक्टरांनी या विचित्र आणि दुर्मिळ प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास केला आहे. याचा अहवाल क्युरियस मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे.
या 35 वर्षीय व्यक्तीच्या रागाचे कारण अहवालात दिले नसले तरी, त्यानंतरची संपूर्ण कहाणी त्यामध्ये सांगण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंडोमसह केळ गिळल्यानंतर काही वेळाने त्या व्यक्तीला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. अन्न-पाणी घेणेही त्याला कठीण झाले. याशिवाय त्याने 24 तास लघवीही केली नाही. प्रकृती खूपच बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. (हेही वाचा: Free Condoms: थायलंड पुरवणार 95 दशलक्ष मोफत कंडोम; व्हॅलेंटाईन डेच्या आधी Safe SEx ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न)
तिथे त्याचे प्रथम सीटी स्कॅन करण्यात आले, ज्याचा अहवाल पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यांना या व्यक्तीच्या आतड्याजवळ कंडोममध्ये गुंडाळलेले केळ दिसून आले. या केळाने आतड्याचा मार्गच अडवला होता, त्यामुळे आतडे फुटण्याची शक्यता होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. सुमारे एक तास ऑपरेशन चालले आणि हे केळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला सुमारे तीन दिवस रुग्णालयात ठेऊन डिस्चार्ज देण्यात आला.