दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र थायलंड हे व्हॅलेंटाईन डेच्या आधी सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर थायलंडने लैंगिक संक्रमित रोग आणि किशोरवयीन गर्भधारणा रोखण्यासाठी 95-दशलक्ष मोफत कंडोम वितरित करण्याची योजना आखली आहे. 1 फेब्रुवारीपासून, युनिव्हर्सल हेल्थकेअर कार्डधारक एका वर्षासाठी आठवड्यातून 10 कंडोम मिळवण्यास पात्र आहेत, असे सरकारी प्रवक्ते रचदा धनादिरेक यांनी सांगितले. कंडोम देशभरातील हॉस्पिटल्सच्या फार्मसी आणि प्राथमिक देखभाल युनिटमधून मिळू शकतात.

याधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अशी घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, एड्स, इतर लैंगिक संक्रमित रोग आणि तरुण लोकांमधील नको असलेली गर्भधारणा कमी करण्यासाठी 18 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कंडोम विनामूल्य दिले जातील. यावर्षी 1 जानेवारीपासून हे कंडोम फार्मसीमध्ये उपलब्ध केले गेले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)