Amazon | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ऑनलाईन सेना देणारी नामवंत ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अ‍ॅमेझॉन मार्फत विकल्या जाणाऱ्या पायपुसण्या आणि आंतरवस्त्रे (Underwear) आदींवर हिंदू देवी- देवतांची (Hindu Gods-Goddesses) चित्र असल्याचे पुढे आले आहे. अनेक युजर्सनी या वस्तूंची छायात्रिचे शेअर, पोस्ट करत ट्विटरवर #BoycottAmazon हॅशटॅग सुरु केला आहे. जे युजर्स #BoycottAmazon हॅशटॅगला पाठिंबा दर्शवत आहेत ते युजर्स संताप व्यक्त करत आहेत. तसेच, या वस्तूंवर तातडीने बंदी घालण्यात यावी अशीही या यूजर्सची मागणी आहे.

काय आहे प्रकरण?

#BoycottAmazon हॅशटॅग अंतर्गत अनेक युजर्सनी शेअर, पोस्ट केलेल्या छायाचित्रांनुसार पायपुसणी आणि अंतर्वस्त्रांवर हिंदू देवी-देवतांची चित्रे आहेत. पायपुसण्यांवर (दारासमोर टाकायचे डोअर मॅट) हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या 'ॐ' अद्याक्षराचे चिन्ह दिसत आहे. दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी काही अंतरवस्त्रांवर हिंदू देवी-देवतांची चित्रे आहेत. ही चित्रे नेमकी कोणत्या देवी-देवातांची आहेत याबाबत स्पष्टता पुढे आली नाही. परंतू, या वस्त्रांवर ही चित्रे असल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Amazon Responds To MNS: मनसे ठाम! अॅमेझॉन कंपनी संस्थापक जेफ बेजॉस यांनीही घेतली दखल)

दरम्यान, हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अनेक उत्पादने विदेशात विकली जातात. भारतातही विकली जातात. परंतू, पायपुसणी अथवा अंतर्वस्त्र आदींसारख्या उत्पादनांवर अशी चित्रे छापली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या पूर्वीही अनेक वेळा असा घटना घडल्या आहेत. तेव्हाही अनेक ट्विटर युजर्सनी संताप व्यक्त केला होता. काही युजर्सनी हिंदू देवीवदेवतांची चित्रे अशा उत्पादनांवर छापून विदेशामध्ये भारताची प्रतिमा आणि संस्कृती अपमानीत केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, या आधी जेव्हा असा प्रकार घडला होता. तेव्हा आमच्या माध्यमातून आम्ही अशा प्रकारची उत्पादने विकली जाणार नाहीत याची दक्षता घेऊ, असे अ‍ॅमेझॉनकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतू आता पुन्हा एकता त्याच प्रकाराची पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.