Exam प्रतिकात्मक फोटो (PC - pexels)

Punjab: पंजाबमधील फरीदकोट (Faridkot) येथील एका परीक्षा केंद्रावर (Examination Centre) आपल्या मैत्रिणीच्या वेशात परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाचा डाव निष्फळ ठरला. बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे डीएव्ही पब्लिक स्कूल, कोटकापुरा येथे 7 जानेवारी रोजी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर परीक्षा घेण्यात आली. फाजिल्का येथील अंग्रेज सिंहने त्याची मैत्रीण परमजीत कौरच्या वेशात परीक्षा देण्याचे ठरवले. हातात लाल बांगड्या, कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक आणि सूट घातलेला अंग्रेज सिंग परीक्षेसाठी सज्ज झाला होता.

परंतु, अंग्रेजच्या या खटाटोपाचा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सुगावा लागला आणि त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंगने बनावट मतदार आणि आधार कार्ड वापरून आपण परमजीत कौर असल्याचे सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. बायोमेट्रिक यंत्रावरील प्रत्यक्ष उमेदवाराच्या बोटांचे ठसे जुळू शकले नाहीत. त्यामुळे अखेर अंग्रेजचा प्लान फिसकटला. (हेही वाचा -Woman Crashes Scooty Into A Wall: स्कूटीवर भरधाव वेगात जाताना अचानक समोर आली भींत; पुढे काय घडलं तुम्हीचं पहा अपघाताचा थरार, Watch Video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंगने बनावट मतदार आणि आधार कार्ड वापरून आपण परमजीत कौर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बायोमेट्रिक यंत्रावरील प्रत्यक्ष उमेदवाराच्या बोटांचे ठसे जुळले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. (हेही वाचा - - Couple Indecent Stunt On Bandra Reclamation: बाइकवर रोमान्स! मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनवर जोडप्याचा अश्लील स्टंट; गुन्हा दाखल, Watch Video)

दरम्यान, अंग्रेज सिंगवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी अंग्रेज सिंगला ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या मुलीच्या जागी अंग्रेज पेपर देण्यासाठी आला होता तिचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तथापी, अंग्रेज सिंगने याआधी इतर कोणाची परीक्षा दिली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.