Ajit Pawar-Supriya Sule | (Photo Credits: Twitter/ANI)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजभवन येथे थेट जाऊन घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडालेली खळबळ, पवार कुटुंबीयांवर आलेला ताण या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाने जवळून पाहिल्या. यात प्रसारमाध्यमांनीही त्यात नको तितकी भर घातली. या भरीनंतर या संघर्षाला संघर्षाची कुटुंबकलह आणि राजकारणाची किनार मिळाली. त्यानंतर अनेक घटना घडामोडी घडल्या आणि अखेर अजित पवार पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकासआघाडीमध्ये आनंद, उत्साह संचारला. याचे प्रत्यंतर आज विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीवेळीही आला. मात्र, असे असतानाही प्रासरमाध्यमं पिच्छा पुरवणं कमी करताना दिसत नाही. आज तर सुप्रिया सुळे-अजित पवार (Supriya Sule-Ajit Pawar) या दोघांच्या गळाभेटीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा अतिरेख इतका मजेशीरपणे पाहायला मिळाला की, ही भेट होत असताना चक्क वृत्तवाहीणीच्या प्रतिनिधीचा बूमही हातासह दोघांच्या मध्ये डोकावला. अखेर बूम सोडून देत या प्रतिनिधीला हात मागे घ्यावा लागला. अर्थात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या अतिरेकाकडे दुर्लक्ष केले असले तरी, बहिण-भावाच्या नात्यात मीडिया खलनायक होत असल्याच्या चर्चा उपस्थितांमध्ये काही काळ रंगल्या.

दरम्यान, विधिमंडळ परिसरात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते. त्याला अजित पवार यांनी भाजपच्या नादी लागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप असे या बंडाचे वर्णन केले जात होते. मात्र, हे बंडही देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाप्रमाणे औटघटकेचे ठरले. अजित पवार राष्ट्रवादीत परतले. त्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला संघर्षानंतर आलेल्या प्रेमाची किनार होती. (हेही वाचा, महराष्ट्रातून देशाच्या परिवर्तनाची सुरुवात झाली, शिवसेनेचं सूर्ययान दिल्लीतही लँड होईल: संजय राऊत)

एएनआय व्हिडिओ

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापसूनच अजित पवार सर्व बाजूने दबाव आणि पेचात होते. वेळे आणि शब्द पाळणारा नेता अशी अजित पवार यांची ओळख आहे. परंतू, भाजपसोबत जाताना अजित पवार यांचे दोन्ही चुकले असे सांगितले जाते. त्यामुळे एका बाजूला कुटुंब दुसऱ्या बाजूला पक्ष तर तिसऱ्या बाजूला भाजपला दिलेला शब्द अशा तिरेही पेचात अजित पवार सापडले. परंतू, अजित पवार यांना स्वगृही आणण्यात राष्ट्रवादी नेतृत्वाला यश आले.