Solapur Ganpati Bappa Grass Painting | Photo Credits: Twitter

Ganpati Bappa Grass Painting:  महाराष्ट्रासह जगभरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. यंदा 22 ऑगस्ट दिवशी घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होतं. कुणी शाडूची गणेशमूर्ती तर कुणी चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. पण महाराष्ट्रामध्ये सोलापूर (Solapur) मधील बाले गावामध्ये (Bale village) तरूणांनी ग्रास पेटिंग (Grass Painting) मधून गणरायाचं रूप साकारलं आहे. दरम्यान शेतामध्ये साकारलेला हिरवागार बाप्पा (Ganpati Bappa) ट्वीटर सअह सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. महिन्याभरापासून अर्धा एकर शेतामध्ये बाप्पाचं विलोभनीय रूप साकारण्यासाठी ही तरूण गणेशभक्तांची मंडळी काम करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांच्या यश आलं आहे. यंदाच्या गणेश चतुर्थी पूर्वी बाप्प्पाचं रूप साकार झालं आहे.

महाराष्ट्रामध्ये यंदा साधेपणाने आणि पर्यावरण पुरक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक कर्तव्याचं भान राखत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केले आहे. Ganesh Chaturthi 2020 Messages: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव!

सोलापूरातील  गणेश चतुर्थी 2020 ग्रास पेटिंग

महाराष्ट्रात अनेकदा यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मतिदिनी, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ते अगदी हंबीरराव मोहिते चित्रपटासाठी देखील महाराष्ट्राच्या शेतकरी तरूणांनी ग्रास पेटिंग साकरलं होते. ग्रास पेटिंगमध्ये धान्याची पेरणी विशिष्ट चित्राच्या अनुषंगाने केली जाते. त्यामुळे पूर्ण पीक आल्यानंतर अपेक्षित चित्र शेतामध्ये साकारलं जातं.