Bull Entered In Bank: अब्बब! बँकेत घुसला बैल; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले, 'लग्नासाठी कर्ज घ्यायला आला' (Watch Video)
Bull Entered In Bank (PC - Twitter)

Bull Entered In Bank: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मेट्रोमध्ये मुलींच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी लोकांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. परंतु काहीवेळा सोशल मीडियावर असे काही पाहिले जाते जे काही लोकांसाठी भीतीदायक असते. परंतु, इतरांसाठी मनोरंजनाचे माध्यम बनते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बँकेच्या शाखेत एक बैल (Bull) दिसत आहे.

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक बैल बँकेच्या आतमध्ये उभा असलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, हे दृश्य उन्नावच्या एसबीआय बँकेचे आहे, जिथे अचानक एक बैल घुसला. बैलाला पाहून लोक काळजीत पडले. स्वत:चा बचाव करण्यासाठी एका बाजूला जमा झाले. यानंतर गार्डने काठीने बैलाला हाकलण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Rats Feast On IRCTC Food Stall: रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉलवरील अन्नावर उंदीर धावताना दिसले, व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

येथे पहा व्हायरल व्हिडिओ -

नेटीझन्सनी केल्या मजेशीर कमेंट -

हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर @HasnaZaruriHai नावाच्या पेजने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, नंदी महाराज पासबुकमध्ये नोंद घेण्यासाठी आले असावेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, त्यांना लग्नासाठी कर्ज घ्यायचे असेल. दुसर्‍या एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, प्रिंटर सदोष असल्याचे निष्पन्न झाले, पासबुकमध्ये कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे नंदी देवता नाराज होऊन त्याचे खाते बंद करण्यासाठी आले.