Rats Feast On IRCTC Food Stall: भारतीय रेल्वेमध्ये अन्न आणि स्वच्छता ही प्रवाशांसाठी एक प्रमुख चिंतेची बाब बनली आहे. आयआरसीटीसी (IRCTC) कँटीनमधून मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अलीकडेच, आयआरसीटीसीच्या स्टॉलवर उघड्यावर चक्क उंदीर अन्न खात असलेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने रेल्वे स्टेशनवरील अन्नाबाबत चिंता आणखी वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर अपलोड केलेले फुटेज मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शन रेल्वे स्टेशनचे आहे. सौरभ नावाच्या युजरने ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंत्रालयालाही टॅग करण्यात आले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अधिकृत रेल्वे सेवा हँडलने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि याबाबत त्वरित कारवाईचे आश्वासन दिले. या 38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आयआरसीटीसी स्टॉलवर ठेवलेले खाद्यपदार्थ दिसत असून, त्यावर उंदीर धावत आहेत. (हेही वाचा: Viral Video: एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात अचानक आग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)