Tamil Nadu Food Poisoning: विरुधुनगर मंदिर महोत्सवात अन्नातून विषबाधा; 118 जण रुग्णालयात दाखल, दूषित अन्न किंवा पाणी पूरवल्याचा संशय
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात धार्मिक महोत्सवात जेवण घेतल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुले आणि एका गर्भवती महिलेसह 118 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Tamil Nadu: तामिळनाडूच्या विरुधुनगर (Virudhanagar) जिल्ह्यातून शेकडो लोकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक महोत्सवात मोफत जेवण जेवल्यानंतर ११८ जणांना अन्नातून विषबाधा झाली. ज्यात मुले आणि एका गर्भवती महिलेसह इतर महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तींना अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर याचा त्रास जाणून लागला होता. त्यांना मदुराई येथील सरकारी राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात (Tamil Nadu Food Poisoning)आले आहे. जेवणाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये 34 पुरुष आणि 51 महिलांच समावेश आहे. सर्व रुग्ण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्यावर अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून उपचार सुरू आहेत.
Madurai, Tamil Nadu: In Virudhunagar district, 118 people, including children and a pregnant woman, were hospitalised after consuming free meals at a temple festival. Symptoms included vomiting and dizziness. Officials suspect food or water contamination; samples are being… pic.twitter.com/OnWvrV3KNS
— IANS (@ians_india) June 12, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

