1800 Rupaye Viral Song Video (Photo Credits:Youtube)

अलिकडेच सोशल मीडियावर आपल्या कामाचा 1800 रुपये मोबदला मागणार्‍या काकुंंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ काही तासातच जवळपास हजारो लोकांंनी पाहिला, त्यावर मीम्स सुद्धा बनले होते. मात्र आता तर अगदी कहरच म्हणावंं असं काहीतरी घडलंय. या काकुंंच गणित चुकलं असलं तरी त्यांंचे कष्ट आणि भोळेपणा पाहता त्यांंना चुकीने का होईना दोन चारशे रुपये अधिक द्यायला काहीही हरकत नाही असंं म्हणत सुजीत पाटील आणि सोनाली भोईर यांंनी 'तु 1800 दिलेच नाय' हे गाणंं बनवलं आहे, गमंत म्हणजे हे गाणंं सुद्धा आता एवढं व्हायरल झालंंय की आता ओरिजनल व्हिडिओ सोबतच या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा Whatsapp, Facebook सकट सगळीकडे पाहायला मिळतोय. तुम्ही अजुन हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता पाहा...

#JusticeForKaku Video & Memes: 1800 रुपयांंचा हिशोब मागणार्‍या काकु सोशल मीडियावर व्हायरल, पहा हा मजेशीर व्हिडिओ आणि मीम्स

सुजीत पाटील याच्या या गाण्यावर 3 लाख 67 हजारहुन अधिक व्ह्युज आणि तुफान लाईक्स आहेत, व्हिडिओ मध्ये तुम्ही बघु शकाल की ओरिजनल व्हिडिओ मधल्या दोघांंच्या बोलण्याला धरुन गाणंं लिहिलेलं आहे, आता या प्रयत्नावर काही जण हसत आहेत तर काही जण एका दिवसात गाणं लिहिणार्‍यांंच कौतुक करतायत, लोकांंच्या प्रतिक्रिया काहीही असल्या तरी हा व्हिडिओ सर्वचजण पाहतायत हे ही तितकंच खरंंय..

1800 Song Video

दरम्यान, हा व्हिडिओ नुसता व्हायरल झालेला जोक नसुन हा व्हिडिओ पाहुन महाराष्ट्र महिला व बालविकास मंंत्री यशोमती ठाकुर यांंनी सुद्धा दखल घेतली होती. या व्हिडिओतुन शिक्षणाचा अभाव दिसत आहे अशा महिलांंना भविष्यात शिक्षणामुळे समस्या येऊ नयेत यासाठी तरतुद करण्यासंदर्भात यशोमती ठाकुर यांंनी ट्विट केले होते.