आसिया आणि शमशाद (PC - You Tube)

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ही बातमी वाचल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसेल. खरे तर हे प्रकरण पाकिस्तानचे आहे. येथे 18 वर्षीय तरुणी 61 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. दोघांची प्रेम कहाणी (Love Story) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या दोघांच्या कथेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे दोघे एका मुलाखतीदरम्यान आपल्या प्रेमकहाणीबद्दल सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलीचे नाव आसिया आणि पुरुषाचे नाव शमशाद आहे.

आसिया तिच्या प्रेमाची कहाणी सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, ही व्यक्ती स्वतःला भाग्यवान समजत आहे. हा व्हिडिओ यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 72 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्सही केलेल्या पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा -Sister Wrote Long Letter to Convince Brother: भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र; नाराजीचे कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य)

प्रेम करणाऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या अनोख्या प्रेमकहाणीत आसिया 18 वर्षांची आणि शमशाद 61 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 43 वर्षांचा फरक आहे. प्रेमाच्या शत्रूंना या प्रकरणावरून ट्रोल करण्याची संधी मिळाली आहे. व्हिडिओमध्ये आसिया आणि शमशाद त्यांच्या आयुष्याबद्दल खूप आनंदी दिसत आहेत.

आसिया आणि शमशादच्या प्रेमकथेचा व्हिडिओ पाकिस्तानी यूट्यूब चॅनल Pak News 707 वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आसियाने सांगितले की, तिचा नवरा रावळपिंडीमध्ये गरीब मुलींची लग्ने लावायचा. तिला तिच्या पतीचा मदतीचा स्वभाव आवडला. तिला ही सवय इतकी आवडली की, तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आसियाने पुढे सांगितले की, आम्ही एक-दोनदा भेटलो होतो. आसियाला भेटल्यावर खूप बरे वाटले. स्थानिक लोकही शमशादबद्दल चांगले बोलायचे. त्यानंतर तिने त्याच्याशी लग्न करायचे ठरवले. शमशादने तिला कधीही कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही.

याच यूट्यूब चॅनलशी बोलताना शमशाद म्हणाला की, 'मी भाग्यवान आहे की, या वयातही मला असा काळजीवाहू जीवनसाथी मिळाला. आसिया माझी खूप काळजी घेते. माझ्या लग्नाची बातमी कळल्यानंतर अनेक नातेवाईकांनी मला लग्न करण्यापासून रोखले. लोक कुणालाही जगू देत नाहीत. माझ्या आणि आसिया यांच्या वयातील फरकामुळे लोक आम्हाला नावं ठेवत होती. पण, आम्ही कोणाचीही पर्वा न करता आमचे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.