Worli Metro Station | (Photo Credit - X)

Metro Connectivity Mumbai: मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा टप्पा गाठत वरळी स्थानकाचे (Mumbai Metro Line 3) अधिकृत अनावरण करण्यात आले असून, हे स्थानक आता मुंबई मेट्रोच्या अक्वा लाईन 3 चा भाग बनले आहे. कुलाबा-SEEPZ दरम्यानचा हा मार्ग शहरातील पहिला पूर्णपणे भुयारी मेट्रो कॉरिडॉर आहे आणि त्यामुळे दैनिक प्रवाशांसाठी जलद, सुकर आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय खुला झाला आहे. मुंबई मेट्रो लाइन 3 च्या अधिकृत X (ट्विटर) हँडल @MumbaiMetro3 वरून वरळी मेट्रो स्थानकाचे फोटो (Worli Metro Station Photos) शेअर करण्यात आले, ज्यामध्ये प्रवेशद्वार, निर्गम मार्ग व लिफ्ट विभाग दाखवण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की, वरळी भाग पहिल्यांदाच मेट्रो कनेक्टिव्हिटी शी जोडला गेला आहे.

अक्वा लाईनचा महत्त्वाचा टप्पा

अक्वा लाईन 3 हे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवणारे प्रकल्पांपैकी एक मानले जाते. एकूण 33.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोलाबा ते SEEPZ पर्यंत जातो आणि 27 स्थानकांवर थांबा घेतो.

प्रमुख स्थानके:

  1. चर्चगेट
  2. दादर
  3. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)
  4. वरळी (स्थानक क्रमांक 13)

या लाईनमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

वरळी स्थानकाचे प्रथमदर्शनी दृश्य

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रांमध्ये वरळी स्थानकाची आधुनिक रचना, प्रशस्त प्रवेशद्वार व उंच क्षमतेचे लिफ्ट दिसून येतात. संपूर्ण स्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाईन करण्यात आले आहे.

छायाचित्रे पाहिली का?

दक्षिण-मध्य मुंबईसाठी नव्या कनेक्टिव्हिटीची सुरुवात

वरळी हा दाट लोकवस्ती आणि महत्त्वाचा व्यापारी भाग असून, आजवर येथे थेट रेल्वे किंवा मेट्रो कनेक्टिव्हिटी नव्हती. अक्वा लाईनच्या या स्थानकामुळे वरळी भाग आता शहरातील व्यावसायिक, शैक्षणिक आणि निवासी केंद्रांशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार आहे.

जोणडणी होणारे प्रमुख भाग:

  • दक्षिण मुंबईतील पारंपरिक व्यापारी केंद्रे
  • BKC मार्गे पश्चिम उपनगर
  • SEEPZ व तिथली आयटी कंपन्या

दरम्यान, मुंबई मेट्रो लाइन 3 च्या उर्वरित स्थानकांचे बांधकाम आणि प्रणाली समाकलन अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण लाईन सुरू झाल्यानंतर दररोज लाखो मुंबईकरांच्या प्रवासात आमूलाग्र बदल घडणार आहे. वरळी स्थानकाचे अनावरण हे मुंबईसाठी भविष्यातील भुयारी सार्वजनिक वाहतुकीच्या युगाची सुरुवात ठरली आहे.