Uttar Pradesh Crime: सासरच्या माणसांकडून महिलेला बेदम मारहाण, तिघांना अटक, मैनपूरी येथील घटना
Uttar Pradesh Crime PC TWITTER

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मैनपूरी भागात मानुसकीला काळीमा फासणारी घडना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ नंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घनटेनंतर महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. या विचित्र घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुण्यात आता अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही होणार कारवाई)

काही हल्लेखोरांनी महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर तीच्या अंगावरील कपडे फाडून तिला काठीने मारत असताना दिसत आहे. महिला विनंती करत असताना देखील हल्लेखोरांनी मारण्याचे थांबवले नाही. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना २९ फेब्रुवारी रोजी घडली आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. तक्रारीत सांगितले की, तीचे सासरे, मेहुणे आणि करहल येथील दोन अज्ञात पुरुषांनी तीला क्रूरपणे मारहाण केली आणि तीला विवस्त्र केले. एकाने तर शस्राचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केले आहे. महिलेच्या सासऱ्याला अद्याप अटक केले नाही. नरेंद्र कुमार, राजीव, दीपू आणि कृष्णा मुरारी अशी आरोपींची ओळख पटली आहे. त्यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.