Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

Pune Koyta Gang: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. मध्यंतरी शहरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे चित्र होते. त्यानंतर गुंडाची हत्या या प्रकरणांमुळे पुणे शहराचे नाव खराब होत आहे. त्यावर आता पोलीस आयुक्तांनी(Pune Police Commissioner Amitesh Kumar) कारवाईचा ईशारा दिला आहे. शहरातील लोकवस्तीत हातात कोयता घेऊन टोळी करुन गुन्हेगार फिरत होते. या टोळक्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. त्या अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग पाहता पुणे पोलिसांनी (pune police) त्या मुलांच्या पालकांवरसुद्धा कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा:Pune Koyta Gang: कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय? (पाहा व्हिडिओ))

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून मोठे गुन्हे होताना दिसत आहेत. पुण्याचा उडता पंजाब होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत. (हेही वाचा:Pune Koyta Gang: भररस्त्यात टोळक्यांचा तिघांवर जीवघेणा हल्ला, पुण्यातील कोयत्या गॅंगचा धुमाकुळ (Watch Video))

अल्पवयीन मुलांकडून जर कुठला गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे काम त्यांच्या पालकांचे आहे. पालकांनी त्यांची ही प्राथमीकता लक्षात घ्यावी. त्यामुळे जर अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर आता त्या मुलांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनीदेखील कोयता गँगचा सुपडा साफ करण्याचे आदेश दिले होते. गुन्हेगारांनी जर ऐकलं नाही तर त्यांना थेट टायरमध्ये टाकणार असे देखील संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त कोयत्या गँगची दहशत मोडित काढण्यासाठी अॅक्शन प्लॅन राबवत असल्याची चर्चा आहे.