Pune Koyta Gang: पुण्यात कोयत्या गॅंगचा धुमाकुळ सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी एका स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याप्रकरणी १७ वर्षांच्या मुलांना पोलिसांनी अटक केले. त्यानंतर ही घटना ताजी असताना, बुधवारी रात्री १० जणांच्या टोळक्यांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गोहे बुद्रुक येथे घडली. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हेही वाचा- दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील गोहे बुद्रुक येथील रस्त्यावर तीन तरुणांच्या मागे १० ते ११ जणांच्या टोळक्यांनी कोयता घेऊन पाठलाग केला. त्यानंतर तरुणांवर कोयत्यांने जीवघेणा हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गुंड्यांच्या हातात कोयता आणि तलवार दिसत आहे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मध्ये जाऊन फिल्मी स्टाईलने तरुणांवर हल्ला केला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला आहे. पुण्यात कोयता गॅंगची गुंडागिरी कधी संपेल? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा केला आहे. पुण्यातील गुंड्याना पोलिसांची धाक उरलीच नाही असं देखील हिणावले आहे. या वर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.