पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा (Watch Video)
The accused woman creating ruckus at Pune housing society | (Photo Credits: ABP News/Screengrab)

पुणे  शहरात बावधन (Bavdhan) मधील रामनगर परिसरात मंगळवार (20 ऑगस्ट) च्या रात्री दारू नशेत स्वाती सौरभ या महिलेने मुद्दामून गाड्यांना टक्कर मारून हंगामा केल्याची गोष्ट समोर आली आहे. या प्रकारामध्ये रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांना त्या महिला चालिकेने जाणून बुजून ठोकर मारत नासधूस केल्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये एक नॅनो कार  (Nano Car) देखील चिरडण्यात आली आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांसमोर चौकशी करताना तिने कपडे उतरवण्याची भाषा केली होती.  दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकांचे नाव पोलिसांच्या संकेतस्थळावर झळकणार

स्वातीला स्थानिक पोलिस स्थानकामध्ये आणल्यानंतरही तिने पोलिस स्टेशनमध्ये हंगामा केला आहे. महिला पोलिस कर्मचार्‍यांसोबतही तिने गैर वर्तन केल्याचा आरोप पोलिसांनी तिच्यावर आला आहे. स्वातीच्या कुटुंबियांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले. स्वातीच्या कुटुंबियांनी तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही सांगितले आहे. मात्र पोलिसांनी या अपघात आणि पोलिसांशी केलेल्या गैरवर्तवणूकीबद्दल तक्रार दाखल करून घेतली असून या प्रकाराचा अधिक तपास सुरू आहे.

बावधन भागातील घटनेचा व्हिडिओ

 पोलिसांसोबत उर्मट वर्तन 

स्वाती सौरभ ही एक एसयुव्ही कार चालवत होती. तिने आपल्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही गाड्यांना मुद्दामून टक्कर मारली आहे. हा प्रकार ती मुद्दामून करत असल्याचे उपलब्ध व्हिडिओ फुटेजमधूनही समोर आले आहे. स्वातीला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या काही लोकांवरही तिने गाडी चढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पोलिसांनी स्वातीवर केला आहे.