Cabinet Expansion In Maharashtra: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. यानंतर आता महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Cabinet Expansion) 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होऊ शकतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्रिमंडळाची संख्या 43 आहे. यामध्ये भाजपला मुख्यमंत्रिपदासह 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपदे मिळू शकतात. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात जवळपास 30 ते 32 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देऊन मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. यामध्ये भाजपचे 15, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 7-9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
कोणत्या पक्षाकडे कोणते खाते?
भाजपकडे गृह, कायदा आणि न्याय, गृहमंत्री बांधकाम, ऊर्जा, सरकारी नीतिमत्ता, पाटबंधारे, ग्रामीण विकास, पर्यटन, महसूल, कौशल्य विकास, सामान्य प्रशासन आणि आदिवासी विभाग असू शकतात. तर शिवसेनेकडे नगरविकास, उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय, पर्यावरण, खाण, पाणीपुरवठा, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दिले जाऊ शकतात. याशिवाय राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, अन्न व पुरवठा, एफडीए, कृषी, महिला व बालविकास, क्रीडा आणि युवक कल्याण आणि मदत व पुनर्वसन ही खाती मिळू शकतात. (हेही वाचा -Pro-Tem Speaker of Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; आज राजभवनावर शपथविधी)
भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार -
प्राप्त माहितीनुसार, भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते दिले जाऊ शकते. तर अजित पवार अर्थखाते मागत आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांना गृहखातेबरोबरच अर्थखाते स्वत:कडे ठेवायचे आहे. या विभागाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्या बदल्यात भाजप अजित पवारांना ऊर्जा किंवा गृहनिर्माण खाते देण्याची शक्यता आहे. याशिवाय नगरविकास, महसूल, आदिवासी, कृषी, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. (हेही वाचा -Amruta Fadnavis's Frst Reaction After CM Oath Ceremony: 'मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे'; मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया (Video))
दरम्यान, भाजपला नगरविकास खाते स्वतःकडे ठेवून महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेकडे द्यायचे आहेत. मात्र, अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. याशिवाय विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे सभापतीपद भाजपला आपल्याकडेच ठेवायचे आहे. त्यांना विधानसभेचे उपसभापतीपद अजित पवार आणि विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे द्यायचे आहे.