Amruta Fadnavis's Frst Reaction after CM Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. शावाथ्विधी सोहळ्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या पतीच्या तिसऱ्या टर्मबद्दल आनंद व्यक्त केला. याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया देताना पुढील कार्यकाळात आपण जनतेची सेवा करत राहू असे सांगितले. शपथविधी समारंभानंतर लगेचच त्यांनी एएनआयला सांगितले, ‘मी आनंदी आहे. देवेंद्रजींनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते सहावेळा आमदार आहेत. त्यांनी आपला जीवनकाळ जनतेची सेवा करण्यात व्यतीत केला आणि पुढेही करत राहतील.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘मी पुन्हा येईन, ही एक लोकसेवेसाठी मी पुन्हा येईन ही त्यांची एक घोषणा होती. जनतेची सेवा करण्यासाठी ते रोज येतच राहतील. त्यामुळे मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे, त्यामुळे आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन होईल.’ त्या म्हणाल्या, ‘राज्यात महिलासाठी अनेक योजना आहेत. आवश्यकतेनुसार आणखी योजना जोडल्या गेल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले पाहिजे.’ (हेही वाचा: Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी)
मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया-
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)