रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी संयुक्तपणे रायगडमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून 2.20 कोटींची जमीन खरेदी केली; तर Arnab Goswamy ला लक्ष्य करण्याचं कारण काय? किरीट सोमय्या यांचा सवाल
Kirit Somaiya,Arnab Goswamy, Uddhav Thackeray (PC - PTI)

Kirit Somaiya On Arnab Goswamy Case: श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा रवींद्र वायकर (Manisha Vaikar) यांनी संयुक्तपणे रायगड जिल्ह्यातील कोर्लाई येथे कै. अन्वय नाईक, श्रीमती अक्षता नाईक यांच्याकडून मार्च 2014 मध्ये 2.20 कोटींची जमीन खरेदी केली. त्यामुळे अर्णब गोस्वामीला लक्ष्य करण्याचं कारण काय? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून यांसंदर्भात ठाकरे सरकारला सवाल केला आहे. यात त्यांनी अधिकार अभिलेख पत्रकाचे फोटो देखील शेअर केले आहेत. यात अन्वय नाईक यांचा ठाकरे परिवाराशी जमिन व्यवहार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय किरीट सोमय्या यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार •गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना 7/12 प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे नव ठिकाणी दिसत आहेत. (हेही वाचा - Tejashwi Yadav: तेजस्वी यादव यांच्या यशानंतर शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, रोहीत पवार यांनी अशी दिली प्रतिक्रिया)

याशिवाय किरीट सोमय्या आज दुपारी 2.45 वाजता भाजपा नरिमन पॉईंट कार्यालयात "रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंब" जमिन व्यवहारावर संक्षिप्त चर्चा करणार आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 5 हजार बेड्सचं रुग्णालय उभारण्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून 5 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान, बिहारमध्ये शिवसेनेचं डीपॉझिट गुल. 1 टक्का मतंदेखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार? असा सवालदेखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी बिहार निवडणुकीत्या निकालावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.