बिहार विधानसभा निवडणूक 2020 ( Bihar Assembly Election Results 2020) मध्ये तेजस्वी यादव Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल (RJD) या पक्षास थेट सत्ता मिळाली नाही. परंतू, सत्तेच्याही पलिकडे जाऊ असे काही खास मिळाले. ते म्हणजे बिहारच्या राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करण्याची संधी. वयाच्या अवघ्या तिशीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व सिद्ध करण्याची संधी फारच कमी लोकांना मिळते. तेजस्वी यादव त्यापैकी एक ठरले आहेत. तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 75 जागा मिळाल्या आहेत. बिहारमधील तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तेजस्वी यादव यांच्या या विजयानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया इथे देत आहोत.
तेसस्वी यांची 'बिग अचीवमेंट'! देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल- शरद पवार
एका बाजूला प्रचंड अनुभवी आणि जेष्ठ नेते असता दुसऱ्या बाजूला अगदी नवखे अनुभव नसलेले तेजस्वी यादव. असे असतानाही तेजस्वी यादव यांनी जे यश संपादन केले आहे ती 'बिग अचीवमेंट' म्हणावी लागेल. तेजस्वी यादव यांच्या यशामुळे देशातील तरुणाईला प्रेरणा मिळेल. . इन्स्पिरेशन मिळेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
तेजस्वी यादव 'मॅन ऑफ द मॅच'- संजय राऊत
कोणतंही बळ नसताना तेजस्वी यादव यांनी संघर्ष केला. सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला. अवघी केंद्रीय यंत्रणा कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या तरीही तेजस्वी यादव हेच 'मॅन ऑफ द मॅच' ठरले आहेत. त्यांच्या संघर्षाचे कौतुक व्हायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजया राऊत यांनी दिली आहे. (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?)
मैंने जीत के बाजी हारी है- जयंत पाटील
'मेरे हार की चर्चा होगी जरूर, मैंने जीत के बाजी हारी है' असे म्हणत बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत- रोहित पवार
बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले
तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए वियजी झाले आहेत. तर महागठबंधनचा निसटता पराभव झाला आहे. बिहामध्ये एनडीएला 125 जागा माळाल्या आहेत. त्यपैकी भाजप 74, जदयु 43, VIP 4, HAM 4 अशी विभागणी आहे. तर महागठबंधनला 110 जागा मिळाल्या आहेत. त्यात आरजेडी 75, काँग्रेस 19, डावे पक्ष 16 अशी विभागणी आहे. याशिवाय 8 जागा इतर पक्षांना मिळाल्या असून, त्यात AIMIM 5, BSP 1, LJP 1, अपक्ष 1 अशी विभागणी आहे.