Shiv Sena: शिवसेना नावं आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हबाबत आता दोन्ही गटाची नेमकी भुमिका काय? जाणून घ्या निवडणुक आयोगाच्या कालच्या निर्णयापासून तर आतापर्यतच्या सविस्तर घडामोडी
Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना आपलीचं अशा पक्षावर दावा सांगणाऱ्या शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटाला (Thackeray Group) निवडणुक आयोगाने (Election Commission) चांगलाचं दणका दिला आहे. कारण शिवसेना (Shiv Sena) हे पक्षाचं नाव किंवा धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता दोन्ही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय काल संध्याकाळी निवडणुक आयोगाने दिला आहे. तरी निवडणुक योगाने दिलेला हा फक्त तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. कारण निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहे त्यात पक्षनावं किंवा पक्ष चिन्हा हा तीढा सध्या तरी सुटण्यासारखा नसल्याने निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

 

तरी आता उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षास शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Balasaheb Thackeray) नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच ठाकरे गटाकडून आता पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय जारी करण्यात आले आहेत. यांत त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल असे तीन पर्याय आहे. तरी निवडणुक आयोग आता ठाकरे गटाच्या कुठल्या चिन्हावर शिक्कामोर्तब करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी आता शिंदे गट पक्षाचं कुठलं नाव किंवा कुठलं चिन्ह निवडणुक आयोगाकडे जारी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे हा वाचा:-Shiv Sena: शिवसेना पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने; एकमेकांवर टीकास्त्र सोडत पक्षचिन्ह गमावल्याची खंत व्यक्त)

 

दोन्ही गटांना नव्या चिन्हाची तसेच पक्षाच्या नावाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले गेले आहेत अशी माहिती निवडणूक आयोगानं शिंदे आणि ठाकरे गटास दिली आहे. तरी निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे.