Ahmedabad Plane Crash: हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांच्याकडून दु:ख व्यक्त; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट
एअर इंडियाचे विमान लंडनला जात होते आणि उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला त्यात ते कोसळले. या घटनेनंतर बचाव पथकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील मेघनीनगरमध्ये 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. लंडनला जाणारे विमान AI171 उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने ही दुःखद घटना घडली. विमाव कोसळताच परिसरात लांबपर्यंत धूराचे लोट दिसत होते. हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांनी या दुःखद घटनेवर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या. "अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल एकूण धक्का बसला. माझ्या प्रार्थना सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत." युसूफ पठाण यांनी लिहिले की, "अहमदाबाद विमानतळाजवळ एअरइंडियाचे विमान अहमदाबाद-लंडन जाताना झालेल्या घटनेबद्दल ऐकून खूप धक्का बसला. सर्व प्रवासी आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."
Very shocked to hear about the #AirIndia Ahmedabad-London flight incident near Ahmedabad airport. Praying for the safety of all passengers and crew. 🙏#PlaneCrash #Ahmedabad
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) June 12, 2025
Very shocked to hear about the #AirIndia Ahmedabad-London flight incident near Ahmedabad airport. Praying for the safety of all passengers and crew. 🙏#PlaneCrash #Ahmedabad
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) June 12, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

