शिवसेनेची (Shiv Sena) शान असलेला धनुष्यबाण आता शिंदे (Shinde Group) किंवा ठाकरे गट (Thackeray Group)  कुणालाही वापरता येणार नाही, असा निर्णय काल निवडणुक आयोगाने (Election Commission) दिला. एवढंच नाही तर शिवसेना पक्षाचं नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नाही, असंही तरी हा तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय आहे. कारण निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. आता शिंदे गट किंवा ठाकरे गट पक्षाचं काय नाव लावणार किंवा कुठलं पक्षचिन्ह वापरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी या दोन्ही गटाकडून निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रीया देण्यात आल्या आहेत.

 

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, खोकेवाल्या गद्दारांनी म्हणजे शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची (Maharashtra) जनता हे सहन करणार नाही. आम्ही आमच्या शिवसेनेसाठी लढणार आणि जिंकणारच! आम्ही कायम सत्याच्या बाजूने आहोत. सत्यमेव जयते, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी आपली संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. (हे ही वाचा:- Shiv Sena: ठाकरे गटाकडून पक्ष चिन्हासाठी निवडणुक आयोगा पुढे तीन पर्याय जारी, ‘हे’ असेल ठाकरे गटाचं नवं पक्षचिन्ह)

 

तर आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) या टिकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. जनतेला विकास हवा असून अडीच वर्षाच्या कालावधीत काय विकास केला याचा लेखाजोखा तुम्ही मांडू शकत नसल्याची टीकाही केसरकर यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी असा घणाघात दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.