Form 16 and IT Return | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तुम्ही जर इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करत असाल तर तुम्हाला फॉर्म 16 (Form 16) हा शब्द नेहमी ऐकावा लागत असेल. अनेकदा चर्चेत असलेला हा Form 16 म्हणजे नेमके आहे तरी काय? (What is Form 16) जो ITR फाइल करताना बराच महत्त्वाचा ठरतो. सोप्या भाषेत सांगायचे तर Form 16 हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते. जे आपल्याला प्रत्येक आर्थिक वर्षात कंपनी द्वारा देण्यात येते. हे प्रमाणपत्र कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यास देणे बंधनकारक असते. ज्यात कर्मचाऱ्याचे वेतन अथवा भत्ता रुपात मिळालेले वेतन. त्यावर लागणारा कर आणि कपात झालेला करत याबाबत माहिती असते. हे प्रमाणपत्र आयकर कायद्यातील कलम 203 अन्वये दिले जाते. यात लिहिलेलेल असते की कर्मचाऱ्याची एकूण उत्पन्नापैकी (वेतन) टीडीएस रुपात कपात केली जाते आणि जमा केली जाते. Form 16 चे दोन भाग पडतात. जाणून एकूण Form 16 बाबत.

Form 16 Part A:

फॉर्म-16 चा पहिला भाग असतो Part A. यामध्ये कंपनीचे नाव, पत्ता आणि पॅन क्रमांक असतो. TAN नंबर सोबत कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक सोबत कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक नोकरीचा कालावधी लिहिलेला असतो. याशिवाय या कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या वेतन आणि त्यातून होणाऱ्या कर कपातीबाबत (टीडीएस ) माहिती असते. (हेही वाचा, Form 16 मध्ये आयकर विभागाचा मोठा बदल, Tax न भरणाऱ्या पगारी कर्मचाऱ्यांना दणका)

Form 16 Part B:

फॉरम 16 पार्ट बीमध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनाचा संपूर्ण तपशील दिलेला असतो. कलम 10 अन्वये मिळालेली सूट, प्राप्त भत्ते आणि इतर मोबदला या सर्व बाबींबाबत माहिती असते. आयकर कायद्यान्वये दिल्या जाणाऱ्या सवलतीचाही यात उल्लेख असतो.

आयटीआर फाईल करताना किती आवश्यक?

आयटी आर फाईल करतान फॉर्म 16 आवश्यक ठरतो. कारण, कर्मचाऱ्याच्या मूळ उत्पादनाबाबत त्यात भाष्य केलेले असते. त्याबाबतचा संपूर्ण तपशील त्यात पाहायला मिळतो. आयटीआर करताना फॉर्म 16 असणे आवश्यक असते. पण, तो जर नसेल तर फारसे बिघडत नाही. तुम्हाला इतर काही कागदपत्रे देऊन आयीआर फाईल करता येते. त्यासाठी सॅलरी स्लीप, फॉर्म 26, टॅक्स क्रिडिट स्टेटमेंट यासारखी कागदपत्रे लागतात. पण या सर्व कटकटींपासून मुक्तता करायची असेल तर आपणास फॉर्म 16 आवश्यक आहे.