Maharashtra Weather Forecast: वातावरणाचे खेंदाट! अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उन्हाचा तडाका; माहाराष्ट्रातील हवामान अंदाज, घ्या जाणून
अवकाळी पाऊस आणि तापमान | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाळा जोर धरतो आहे. वाढत्या तापमानासोबत उन्हाचा तडाखा आणखीच वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain in Maharashtra) कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणाचा हा नेमका कोणता प्रकार आहे हे समजणे कठीण झाले आहे. एका बाजूला अवकाळी, कडाक्याचे उन आणि दमट वातावरण यांमुळे वातावरणाचे खेंदाट झाल्याचे पाहयला मिळत आहे. संमिश्र वातावरणाचा (Maharashtra Weather Forecast) राज्यातील शेती आणि तत्सम उद्योगांनाही चांगलाच फटका बसतो आहे. वातावरणातीह ही स्थिती आणखी काही काळ थोड्याफार फरकाने अशीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळच्या प्रहरीसुद्धा उन्हाचे चटके

राज्यातील तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे सुर्योदयानंतर सकाळच्या प्रहरीसुद्धा उन्हाचे चटके बसत आहेत. मराठवाड्यात तर ऊन आणि पावसाचा पाठशिवणीचाच खेळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील असा अंदाज आहे. (हेही वाचा, Weather: या राज्यांमध्ये उष्णतेची लाट, दिल्लीत पारा 39 अंशांवर पोहोचला, पावसाचीही शक्यता)

पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता

हवामानाचा अंदाज वर्तवताना आयएमडीने  म्हटले आहे की, राज्याती काही जिल्ह्यांमध्ये पुढचे आठवडाभर (7 दिवस) अवकाळी पावसाची चिन्हे आहेत. शिवाय कोकण आणि गोव्यात 21,22 एप्रिल यादोन दिवसांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या पुण्यातही तापमान 41 अंश सेल्सिअस (18 एप्रिल) इतके नोंदवले गेले. धक्कादायक म्हणजे पाठिमागच्या 11 वर्षांमध्ये नोंदवले गेलेले हे सर्वोच्च तापमान आहे. समुद्र किनारपट्टी भागातही जवळपास 34 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. (हेही वाचा, Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाजl)

हवामानाच्या महत्त्वाच्या नोंदी

  • मालेगाव आणि बीड येथे तापमानाची उंच्चांकी (34 अंश सेल्सियस) नोंद
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलोकट तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची नोंद.
  • अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान, झाडे उन्मळली, घरांचे पत्रेही उडाले, अनेक ठिकाणी विजपूरवठा खंडीत.
  • वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण
  • अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा
  • उष्णतेपासून दिलासा मिळाला तरी शेतकऱ्याचे नुकसान

आयएमडीकडून अलर्ट जारी

उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट चारी असलेले जिल्हे- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी

पावसामुळे यलो अलर्ट जारी असलेले जिल्हे- धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ

केवळ राज्यच नव्हे तर देशभरातील तापमानामध्येही मोठ्या प्रमाणावर फेरबदल पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाठ काही ठिकाणी अचानक पाऊस असा प्रकार पाहयला मिळत आहे. जागतिक पातळीवरही अनेक गंभीर बाबी पाहायला मिळत आहे. जसे की, अलिकडेच दुबई येथे कोसळलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेला महापूर.